शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

उरणमधील गोदामाला आग, प्लॅटिनम लॉजिस्टिकच्या गोदामातील ज्वलनशील के मिकलने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 02:46 IST

वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटिनम लॉजिस्टिकच्या गोदामाला बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली.

उरण : तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटिनम लॉजिस्टिकच्या गोदामाला बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. वेश्वी गावातील रहिवासी भयभीती होत घरातून आपल्या कुटुंबासह बाहेर पळाले. या आगीच्या ज्वाळा एवढ्या मोठ्या होत्या की गावात एकच हाहाकार माजला. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटिनम लॉजिस्टिक या माल साठवून ठेवणाऱ्या गोदामात गोदाम व्यवस्थापकांनी ज्वलनशील केमिकलचा साठा शासकीय नियमांची पायमल्ली करून ठेवला आहे. बुधवारी या गोदामात ज्वलनशील केमिकलचा साठा असणाºया परिसरात काही कामगार वेल्डिंगचे काम करीत होते. यावेळी या वेल्डिंगच्या कामातील आगीची एक ठिणगी ज्वलनशील केमिकलच्या साठ्यावर पडली असता, या केमिकलच्या पदार्थाने पेटघेतला.यावेळी केमिकलला लागलेल्या आगीची तीव्रता एवढी होती की वेश्वी गाव परिसरात आगीच्या ज्वाळा, धूर, स्फोटाचे आवाज पसरले. वेश्वी गावच्या नागरी वस्तीजवळच हा माल साठवून ठेवणारे गोदाम असल्याने येथील रहिवासी भीतीपोटी घरातून बाहेर पडले. यावेळी गावात एकच हाहाकार माजला.वेश्वी गावचे माजी उपसरपंच विलास पाटील यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. यावेळी पोलीस यंत्रणा, सिडको, जेएनपीटी अग्निशमन दलाच्या जवानांनी वेश्वी गावात धाव घेऊन ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु ज्वलनशील केमिकलच्या साठ्याला लागलेल्या आगीची तीव्रता एवढी होती की अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या जेएनपीटी बंदराच्या वाहतूककोंडीत अडकल्याने यावेळी उपस्थित नागरिकांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. या आगीत जीवितहानी झाली नाही.प्लॅटिनम लॉजिस्टिकच्या गोदामाला लागलेली आग तीन तास झाले तरी आटोक्यात आली नाही, त्यामुळे नेमके काय नुकसान झाले समजणे कठीण आहे, अशी माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :fireआग