शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ज्वालामुखीच्या तोंडावर उरण; रासायनिक प्रकल्प धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 17:36 IST

 जेएनपीटीच्या ५०० हेक्टरमध्ये रिलायन्स, जीबीएल,आयएमसी, इंडियन आईल , आयओटीएल, सुरज ॲग्रो आदि मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

मधुकर ठाकूर 

उरण :  जेएनपीटीच्या ५०० हेक्टरमध्ये रिलायन्स, जीबीएल,आयएमसी, इंडियन आईल , आयओटीएल, सुरज ॲग्रो आदि मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात अत्यंत घातक, धोकादायक, ज्वलनशील आणि विषारी पदार्थ, वायु,रसायनांची हाताळणी केली जाते.तसेच उरण परिसरात ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस आदि प्रकल्पांचाही त्यामध्ये समावेश आहे.या रासायनिक प्रकल्पात वारंवार आग,घातक विषारी केमिकल गळतीच्या घटना घडत असतात.अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी कंपन्यांकडे सर्वच अद्ययावत,स्वयंचलित  यंत्रणा उपलब्ध असल्याचा दावा वारंवार केला जातो.मात्र जेव्हा दुर्घटना घडते त्यावेळी कंपन्यांचे सर्वच दावे फोल ठरतात.यंत्रणा उघड्या पडतात.यामुळे हे रासायनिक प्रकल्प उरणकरांसाठी केव्हाही धोकादायक ठरू शकतात.हे उरणकरांनी वारंवार अनुभव घेतलेला आहे.सिध्दही झाले आहे.

 उरण परिसरातील हे रासायनिक प्रकल्पांची रासायनिक पदार्थ साठविण्याची क्षमता प्रचंड आहे.या रासायनिक प्रकल्पात आग, स्फोटासारखी मोठी दुर्घटना घडल्यास रासायनिक प्रकल्पाच्या ३० किमी परिघातील परिसर बेचिराख होण्याचा धोका आहे. त्यामुळे ज्वालामुखीवर उरण असल्याची भीतीही या आधीच अनेक तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे.मात्र रासायनिक कंपन्या यातुन कोणताही बोध घेतल्यास तयार नाहीत.त्यामुळे रासायनिक प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.उरण येथील ओएनजीसी प्रकल्पाची २० लाख एलपीजी गॅस सिलिंडर साठवणुकीची क्षमता.अशा या मोठ्या प्रमाणावर साठवून क्षमता असलेल्या शुक्रवारी ओएनजीसी प्रकल्पात शुक्रवारी  (८ सप्टेंबर) घडलेली तेलगळतीची घटना उरणकरांसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा आहे.याआधीही प्रकल्पात आग, तेलगळतीची घटना घडल्या आहेत.तेल गळती वेळीच आटोक्यात आली नसती तर ओएनजीसी प्रकल्पाशेजारीच असलेली अनेक गावे आणि लाखो रहिवाश्यांवर ऐन गणेशोत्सवातच गंडातर आले असते.

ओएनजीसी प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या आग आणि तेलगळतीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.बोकडवीरा येथील वायुविद्युत केंद्रातही मागील वर्षी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत एका अभियंत्यासह दोन कामगार मृत्यु पावले होते.दुदैवाने यांचे कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक ना शासनाला ना संबंधित विभागाच्या शासकीय यंत्रणेला आहे.ही बाब अत्यंत धोकादायक ठरू शकते.