शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वापरात नसलेल्या चपलांवर होणार पुनर्प्रक्रिया, दुर्गम भागातील लहान मुलांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 02:08 IST

Navi Mumbai : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महापालिकेने वेस्ट टू बेस्ट ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सोसायट्यांनी या संकल्पनेसाठी पुढाकार घेतला आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महापालिकेने वेस्ट टू बेस्ट ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सोसायट्यांनी या संकल्पनेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जुन्या पादत्राणांवर पुनर्प्रकिया करून विविध चप्पल बनविण्यात येणार आहेत. त्याचा फायदा दुर्गम भागात होणार आहे..या संकल्पनेमध्ये जुनी वापरात नसलेली पादत्राणे सोसायट्यांनी एकत्र करून महापलिकडे सुपुर्द करायची आहेत. ही पादत्राणे महापे येथील ग्रीन सोल कंपनीकडे जमा केली जाणार असून, कंपनी या जुन्या पादत्राणांवर पुनर्प्रकिया करून, लहान मुलांच्या चप्पल, सँडल, बूट तयार करणार आहे. त्यांचे राज्यातील विविध दुर्गम भागातील विद्यार्थी, लहान मुलांना मोफत वाटप करणार आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त बाबासाहेब राजळे यांच्या मागदर्शनाखाली शहरात सदर संकल्पना राबविण्यात येत आहे. मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे त्यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ विभागाचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी नेरुळमधील विविध सोसायट्यांमधील नागरिकांना याबाबत आवाहन केले होते. नेरुळ सेक्टर १९ येथील निलसिद्धी सोसायटीमधील रहिवाशांनी या आवाहनाला प्रतिसाद देत वापरात नसलेली पादत्राणे कचऱ्यात न टाकता महापालिकेकडे सुपुर्द केली आहेत. 

महापालिकेची ''वेस्ट टू बेस्ट'' संकल्पनानवी मुंबई शहरातील कचऱ्याचे ओला, सुका, तसेच ई-कचरा असे वर्गीकरण केले जाते. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तर सुक्या कचऱ्यावरही प्रक्रिया केली जाते, परंतु वापरात नसलेल्या चप्पल, बूट, सँडल आदी पादत्राणेही कचऱ्यात टाकली जातात. त्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी महापालिकेने ‘वेस्ट टू बेस्ट’ संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई