शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरड्यांची वीर जवानांना अनोखी सलामी

By admin | Updated: January 9, 2017 06:25 IST

पाकिस्तानव्याप्त काश्मीर प्रांतातील दहशतवादी हल्ल्याला सडतोड प्रत्त्यतर म्हणून भारतीय जवानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून

पेण : पाकिस्तानव्याप्त काश्मीर प्रांतातील दहशतवादी हल्ल्याला सडतोड प्रत्त्यतर म्हणून भारतीय जवानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ४० अतिरेक्यांचा केलेला खात्मा. त्या भारतीय कमांडोजची ही शौर्यगाथा संपूर्ण भारतीय नागरिकांना प्रेरणा देणारी ठरली. सैनिकांचे अभिनंदन व मनोबल वाढविण्यासाठी संपूर्ण देशभरात चढाओढ सुरू झाली. ‘इट का जबाब पत्थर से’ या अनुषंगाने भारतीय सैनिकांची शौर्यगाथा शालेय जगतातसुद्धा उमटली. पेण महिला शिक्षण संचलित शिशू विकास मंदिरच्या विविध गुणदर्शन वार्षिक कार्यक्रमामध्ये इंडियावाले... दुश्मन के छक्के छुडायेंगे या गीतांवरील समूहनृत्य अविष्कारातून सर्जिकल स्ट्राईकचा धमाकेदार परफॉमस शिशू विकासच्या लिटल चॅम्पसनी सादर के ला.प्रारंभीचे कार्यक्रम उंचीवर नेऊन ठेवल्याने रसिक प्रेक्षकांची उत्कं ठा शिगेला पोहोचल्याचे दिसून आले.शालेय शिक्षणापासून राष्ट्रभक्तीचे धडे मूल्यशिक्षणातून मिळतात. मात्र, ठरावीक प्रसंगी अशा काही लक्षणीय घटना घडतात. त्याचे पडसाद समाजात व शिक्षण जगतात उमटतात. डिजिटल क्रांतीने तर काही दृकश्राव्य स्वरूपात पाहावयास मिळते. भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईकचा केलेला पराक्रम छोट्या बालकांनी विविध न्यूज चॅनेल्सवर पाहिला. सोशल मीडियातही याची बरीच चर्चा झाली, अशा घटनांची दखल शिक्षक व पालकांनी घेतली आणि स्नेहसंमेलनातही या विरांना अनोखी सलामी या चिमुरड्यांनी दिली. या वेळी ‘मला गं बाई जाग आली’ (पारंपरिक गीत) ‘शेपटीवाल्या प्राण्यांची...’ (बडबड गीत) ‘नाच रे मोरा’, ‘झुक झुक गाडी’ (बालगीत) ‘पर्यावरण संवर्धन’ (नाटिका), ‘वृद्धाश्रम’ (नाटिका) कार्टून साँग, शेतकरी गीत, फॅशन शोमध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन आणि गुरू-शिष्य परंपरेवर ‘गुरुपौर्णिमा’ हे नाटक, अशा रंगतदार कार्यक्रमात छोट्या शिशूंनी नृत्य, नाटक सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी देव, सर्व पदाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक अशी मोठी गर्दी जमली होती. (वार्ताहर)