शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

NMMT च्या जखमी वाहकाला युनियनने दिला आर्थिक मदतीचा हात

By योगेश पिंगळे | Updated: August 18, 2023 19:26 IST

नावडे फाटा येथे बसचा टायर फुटून मोठा अपघात झाला होता

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) मध्ये ठोक मानधनावर काम करणारे वाहक काशिनाथ त्रिंबक बावस्कर हे ७१ क्रमाकांच्या बसमधे वाहक म्हणून कर्तव्य पार पाडत असताना नावडे फाटा येथे बसचा टायर फुटून मोठा अपघात झाला होता. या अपघातामध्ये बावस्कर हे जखमी झाले होते. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने बावस्कर यांच्या कुटुंबीयांपुढे विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने पुढाकार घेत बावस्कर यांना शुक्रवारी आर्थिक मदत केली.

अपघातग्रस्त वाहकाला प्रशासनाकडून उपचारासाठी मदत मिळणे तसेच उपचार कालावधीत त्यांचे वेतन सुरु ठेवणे आवश्यक होते. मात्र या काळातील वेतन देखील देण्यात न आल्याने बावस्कर याना विविध आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. शुक्रवारी या जखमी कर्मचाऱ्याची नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी भेट घेतली. यावेळी त्यांना कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना १५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी रविंद्र सावंत यांच्यासमवेत महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, कंत्राटी कामगार युनिट अध्यक्ष संजय सुतार, परिवहन विभाग युनिट अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल चांदणे, इस्माईल सैयद, गोविंद गायकवाड, नरेश मागडे, बाळु भालेराव, विजू राठोड, जितेश तांडेल, अभिषेक पथया, रतन वैद्य, राजेश शेलारकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई