शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

भुयारी मार्ग अपूर्णच

By admin | Updated: March 15, 2016 00:38 IST

सायन-पनवेल मार्गावर पादचाऱ्यांच्या सोयीसाठी होणारे भुयारी मार्ग धोबीघाट झाले आहेत. खारघर टोलनाक्यावर छोट्या वाहनांना सूट मिळाल्याने उत्पन्न घटल्याच्या कारणावरून

- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई सायन-पनवेल मार्गावर पादचाऱ्यांच्या सोयीसाठी होणारे भुयारी मार्ग धोबीघाट झाले आहेत. खारघर टोलनाक्यावर छोट्या वाहनांना सूट मिळाल्याने उत्पन्न घटल्याच्या कारणावरून ठेकेदाराने भुयारी मार्गाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी अर्धवट स्थितीतल्या या भुयारी मार्गामध्ये पाणी साचले असून, त्याचा वापर झोपडपट्टीतील महिलांकडून कपडे धुण्यासाठी होत आहे.मुंबई-पुणे प्रवासातले अंतर कमी व्हावे व वाहतूककोंडी टळावी यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सायन-पनवेल मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. सायन -पनवेल रोडवेज कंपनीतर्फे रस्ता रुंदीकरणाचे हे काम झाले असून त्यावर सुमारे बाराशे कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तर रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर अनेक चौकांमध्ये व महत्त्वाच्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग अथवा पूल उभारले जाणार आहेत. या कामामध्ये बीएआरसी ते कळंबोली दरम्यान १७ पादचारी भुयारी मार्ग व १० पादचारी पुलांचा समावेश आहे. त्यापैकी काही भुयारी मार्गाचे व पादचारी पुलांचे काम सायन पनवेल टोलवेज कंपनीने पूर्ण केलेले आहे. परंतु बहुतांश भुयारी मार्गांचे बांधकाम अनेक महिन्यांपासून ठप्प आहे. भुयारी मार्गातली जागा अपुरी असल्याने काम पूर्ण झाल्यानंतरही ते पादचाऱ्यांसाठी गैरसोयीचे ठरणार आहेत. अशातच ठेकेदार कंपनीनेही खर्च पेलवत नसल्याने भुयारी मार्गाच्या बांधकामात हात वर केले आहेत.सायन-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणावर झालेला खर्च वसुलीसाठी खारघर येथे टोलनाका सुरू करण्यात आला आहे. परंतु या टोलनाक्याला स्थानिकांचा विरोध झाल्यानंतर सरकारने त्यामधून छोट्या वाहनांना सूट दिली आहे. त्यामुळे अपेक्षित अशी टोलवसुली त्या ठिकाणी होत नसल्याचे ठेकेदार कंपनीने पीडब्ल्यूडीला कळवले आहे. शिवाय नुकसानभरपाईच्या मागणीसाठी इतर टोल कंपन्यांसह सायन-पनवेल रोडवेजनेही न्यायालयातही धाव घेतलेली आहे.नेरूळ व खारघर येथील भुयारी मार्गात लगतच्या जलवाहिनीचा अडथळा ठरत असल्याने त्या ठिकाणचे काम ठप्प आहे. मात्र उरण फाटा, कळंबोली सर्कल व इतर ठिकाणच्या बांधकामात अडथळा नसतानाही भुयारी मार्ग अर्धवट स्थितीतच आहेत. हे सर्व भुयारी मार्ग गतवर्षी पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरले होते. मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असतानाही भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यात भविष्यातही अडथळा होण्याची शक्यता आहे. खारघर येथील चौकातून मोठ्या प्रमाणात रहदारी होत असल्याने त्या ठिकाणी पादचारी पूल अथवा भुयारी मार्गाची अत्यंत गरज आहे. वाढत्या रहदारीमुळे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात पादचाऱ्यांचे त्या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. यामुळे होणारा भुयारी मार्ग अरुंद असला तरी, उपयुक्त ठरणार होता. परंतु रखडलेल्या कामामुळे खारघरवासीयांच्या पदरी निराशाच पडली आहे.अपूर्ण स्थितीत बांधलेल्या भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्याने दिवसा त्या ठिकाणी कपडे धुतले जात असले तरी, रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी गैरप्रकार घडण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढणार आहे.बांधकाम ठप्प असल्याने अनेक भुयारी मार्गांच्या झालेल्या कामाची मोडतोड झालेली आहे. त्यामुळे सर्वच भुयारी मार्गांचे काम पुन्हा नव्याने करणे भाग पडणार आहे. परिणामी, कामाचा खर्च वाढून त्याचा अप्रत्यक्ष फटका सर्वसामान्यांनाच बसणार आहे.सायन-पनवेल मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात ठेकेदाराकडून विलंब होत आहे. या प्रकरणी सायन पनवेल रोडवेज कंपनीला नोटीसदेखील बजावलेली आहे. तर नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच योग्य पर्याय अवलंबला जाईल.- सतीश श्रावगे, कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी