शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत वाहन पार्किंगचा वाहतूक पोलिसांना ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 04:18 IST

स्थानक परिसरात वाहतुकीचा बोजवारा : शहरातील अंतर्गत रस्त्यांनाही वाहनतळाचे स्वरूप

नवी मुंबई : शहरात सध्या पार्किंगचा मुद्दा गंभीर बनला आहे. बेकायदा पार्किंगमुळे शहरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराला बकालपण आले आहे. पदपथ व सार्वजनिक ठिकाणी बेमालूमपणे पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांची वाहतूक पोलिसांना डोकेदुखी झाली आहे.

घणसोली स्थानक परिसरात ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहे. या फलकाकडे दुर्लक्ष करीत वाहनधारक सर्रासपणे येथे आपल्या दुचाकी उभ्या करतात. संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाºयांच्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे दिवसेंदिवस येथे दुचाकीची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे या बेकायदा पार्किंगमुळे गुन्हेगाराचे फावले आहे. कोणाचेही नियंत्रण नसल्याने येथून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. तसेच या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांना आग लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. घणसोलीप्रमाणेच शहरातील बहुतांशी स्थानक परिसरात बेकायदा पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शहरातील वसाहतीअंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणचे नो पार्किंग झोन आदी ठिकाणी बेमालुमपणे वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे दैनंदिन साफसफाईच्या कामात अडथळा निर्माण होत आहे.

वसाहतीअंतर्गत रस्ते सुद्धा बेकायदा पार्किंगमुळे व्यापले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रक, खासगी बसेस व इतर व्यवसायिक वाहने उभी केली जातात. त्यामुळे अगोदरच अरूंद असलेले रस्ते आणखी निमुळते झाले आहेत. याचा फटका वाहतुकीला बसला आहे.शाळा व हॉस्पिटलच्या परिसरात तर नेहमीच वाहतूककोंडीचे चित्र पाहायला मिळते. या बेशिस्त व अनधिकृत पार्किंगमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृत पार्किंग करणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईParkingपार्किंग