शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना शाळांवर होणार कारवाई, महापालिकेने बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 03:29 IST

पालिकेने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करूनही अनेक शाळांनी पालिकेला न जुमानता शाळा सुरूच ठेवल्या आहेत. अशा शाळांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देऊन पालिकेने तत्काळ शाळा बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

नवी मुंबई : पालिकेने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करूनही अनेक शाळांनी पालिकेला न जुमानता शाळा सुरूच ठेवल्या आहेत. अशा शाळांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देऊन पालिकेने तत्काळ शाळा बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तर विनापरवाना शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लगतच्या मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश घेण्याचेही आवाहन केले आहे.शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाल्याने शहरात खासगी विनापरवाना शाळांचेही पेव सुटले आहे. शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून भरमसाठ शुल्क आकारून या शाळा कसल्याही परवानगीविना चालवल्या जात आहेत. त्यापैकी बहुतांश शाळांकडून विद्यार्थ्यांना कसल्याही सुुविधा पुरवल्या जात नाहीत. तर रहिवासी जागा, व्यावसायिक गाळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कोंडवाडा करून या शाळा चालवल्या जात आहेत. मागील अनेक वर्षांपासून शहरातील अशा विनापरवाना शाळांची पालिकेकडून यादी प्रसिद्ध केली जाते. मात्र, पालिकेच्या शिक्षण विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने वर्षानुवर्षे अशा शाळा सुरूच आहेत; परंतु या शाळा विनापरवाना असल्याने त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते, त्यामुळे अखेर पालिकेने अशा शाळांवर कारवाईची ठोस भूमिका घेत त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पालिका क्षेत्रात अद्यापही १६ शाळा विनापरवाना सुरू असून, त्यात १५ शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. तर घणसोलीतील सरस्वती विद्यानिकेतन व नेरुळच्या राईट वे इंग्लिश या दोन शाळेचे परवानगी प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.पाल्याने इंग्रजीतूनच शिक्षण घ्यावे, या स्पर्धेत पालकांचे कॉन्वेंट शाळांकडील वाढते आकर्षण लक्षात घेऊन या इंग्रजी माध्यमाच्या शाळा विनापरवाना चालवल्या जात आहेत. त्यानुसार सर्व विनापरवाना शाळा तत्काळ बंद करण्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्या आहेत. ३० जूननंतर या शाळा सुरू राहिल्यास शाळा व्यवस्थापनावर एक लाख रुपये दंडाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. शिवाय, त्यानंतरही शाळा सुरू राहिल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड आकारला जाईल, असाही इशारा देण्यात आलेला आहे. तर चालू शैक्षणिक वर्षासाठी त्या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी लगतच्या मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश घेण्याचेही आवाहन केले आहे; परंतु पालिकेच्या कारवाईच्या इशाºयानंतरही किती विनापरवाना शाळा प्रतिसाद देतील, याबाबतही साशंकता आहे.विनापरवाना शाळांची यादी- अल मोमिन स्कूल, बेलापूर- आॅर्किड इंटरनॅशनल स्कूल, कोपरी- आदर्श कॉन्व्हेंट स्कूल, महापे गाव- सेंट जुडे स्कूल, घणसोली गाव- सरस्वती विद्यानिकेतन स्कूल, घणसोली- अचिएवर्स वर्ल्ड प्रायमरी स्कूल, घणसोली- प्रशिक इंग्लिश स्कूल, रबाळे- कातकरी पाडा- आॅस्टर इंटरनॅशनल स्कूल, कोपरखैरणे- नवी मुंबई ख्रिश्चन इंग्लिश स्कूल,तुर्भे स्टोअर- राईट वे इंग्लिश स्कूल, नेरुळ- सेंट झेविअर्स स्कूल, नेरुळ- इकरा इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ- इलिम इंग्लिश स्कूल, रबाळे-आंबेडकरनगर- रोझ बर्ड स्कूल, तुर्भे स्टोअर- दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल, नेरुळ- एन.पी.एस. स्कॉलर अ‍ॅकॅडमी, घणसोली गाव

टॅग्स :Schoolशाळा