शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत गॅरेज, पार्किंग, झोपड्यांवर हातोडा, कळंबोलीत सिडकोची धडक मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:14 IST

कोरोनाच्या काळात सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी करंजाडे परिसरात कारवाई झाली. त्यानंतर, मंगळवारी कळंबोली येथे सकाळी १० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात करत, अनधिकृत अतिक्रमणावर सिडकोने हातोडा मारला.

कळंबोली: कळंबोली वसाहत येथे मंगळवारी सकाळी सिडकोने धडक मोहीम हाती घेतली.  येथील सिडकोच्या जागेवर अतिक्रमण केलेले गॅरेज, अवजड वाहतूक पार्किंग, ढाबे, झोपडपट्टीवर सिडकोने हातोडा मारत अतिक्रमण हटविले. कोरोनाच्या काळात सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी करंजाडे परिसरात कारवाई झाली. त्यानंतर, मंगळवारी कळंबोली येथे सकाळी १० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात करत, अनधिकृत अतिक्रमणावर सिडकोने हातोडा मारला. पनवेल- मुंब्रा महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांचे पार्किंग, गॅरेज, हॉटेल, ढाबे सुरू होते. यात भंगार गोदामाचा  समावेश आहे. या दुकानात अनेकदा आगी लागल्या आहेत. सेक्टर १० ई, ९ ई, १८ येथील प्लॉटवर अतिक्रमण करण्यात आलेले पक्के बांधकाम, झोपड्या, ढाबे, गॅरेज, पार्किंग, भंगारवाले स्टॉल तोडण्यात आले. यासाठी २ जेसीबी, १ ट्रक, १० लेबर, त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांसह  ३०  पोलिसांचा बंदोबस्त होता. सिडकोचे मुख्य नियंत्रक अनिल पवार, नियंत्रक विशाल ढगे, सहायक नियंत्रक अमोल देशमुख, भूमापक धोंडिबा नामवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साडेचार वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. 

मार्बल मार्केट येथे  केली कारवाई सिडकोकडून सेक्टर २३ येथील मार्बल मार्कट येथील ढाबा, तसेच मार्बल मंदीर विक्रीसाठी सिडको जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. त्यावर मंगळवारी सिडको अतिक्रमण पथकाने कारवाई करत अतिक्रमण हटविण्यात आले आहे.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईParkingपार्किंगcidcoसिडको