शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अम्युझमेंट पार्कच्या जागेवर अनधिकृत गॅरेज

By admin | Updated: December 29, 2015 00:38 IST

महानगरपालिकेने कोपरीमध्ये अम्युझमेंट पार्क उभारण्याचे काम सुरू केले आहे. परंतु पार्क व बाजूच्या सिडकोच्या भूखंडावर गॅरेजचालकाने अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर

नवी मुंबई : महानगरपालिकेने कोपरीमध्ये अम्युझमेंट पार्क उभारण्याचे काम सुरू केले आहे. परंतु पार्क व बाजूच्या सिडकोच्या भूखंडावर गॅरेजचालकाने अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाचेच यास अभय आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोपरीमधील तलावाच्या बाजूला असणाऱ्या भूखंडावर महापालिका अम्युझमेंट पार्क उभारत आहे. पार्क व बाजूचा सिडकोच्या भूखंडाचे क्षेत्रफळ जवळपास ११ हजार चौरसमीटर आहे. पाच कोटी रुपये खर्च करून अम्युझमेंट पार्क उभारले जात आहे. या भूखंडावर मागील काही वर्षांपासून गॅरेजचालकाने अतिक्रमण केले आहे. विलास भोईर या परिसराचे नगरसेवक असताना त्यांनी याविषयी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये वारंवार आवाज उठविला होता. यानंतर सिडकोने व महापालिकेने गॅरेजवर कारवाई केली होती. परंतु अतिक्रमणविरोधी पथकाने पाठ फिरविताच पुन्हा त्या ठिकाणी गॅरेज उभे केले जात आहे. गॅरेजचालकाला नवी मुंबईमधील एका नेत्यानेच अभय दिले असल्याची चर्चा सर्वजण करीत आहेत. प्रशासनाने कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर दबाव येत आहे. यामुळे महापालिका व सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण करून गॅरेजचालक लाखो रुपये कमावत आहे. (प्रतिनिधी)