शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

पनवेल महापालिकेकडून क्षेत्रात अनधिकृत फलकबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:39 AM

स्वच्छता सर्वेक्षण २०१८च्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका विविध उपक्र म राबवत आहे. एकीकडे स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे.

मयूर तांबडे पनवेल : स्वच्छता सर्वेक्षण २०१८च्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका विविध उपक्र म राबवत आहे. एकीकडे स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे पनवेल महापालिकेकडूनच परिसरात अनधिकृतरीत्या फलकबाजी केली जात आहे, यामुळे शहर विद्रूप होत आहे.पनवेल नगरपालिका असताना पनवेल शहर व परिसर बॅनरबाजीमुळे विद्रूप करण्यात येत होते. वाढदिवस, लग्न, साखरपुडा, नियुक्ती आदींचे फलक संपूर्ण पनवेल परिसरात लावून शहराला बकाल केले जात असे. त्यामुळे जागोजागी शुभेच्छांचे फलक निदर्शनास येत असत. मात्र, महापालिकेची घोषणा झाल्यानंतर अनधिकृत बॅनरबाजी विरोधात आयुक्तांनी धडाका लावला होता. अनेकांकडून दंड आकारण्यात आला होता. त्यातून लाखो रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात अनधिकृतरीत्या उभारण्यात येत असलेल्या बॅनरबाजीवर वचक बसला होता. स्वच्छता अभियानात पनवेल महापालिकेनेही सहभाग घेतला आहे.परिसरात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. यासाठी पालिकेकडून फलकबाजी केली जात आहे. पालिकेने पनवेलमध्ये अधिकृत फलकबाजी करण्यासाठी भाडे तत्त्वावर स्टँड उभारले आहेत. मात्र, पालिकेकडून बेकायदा फलकबाजी केली जात आहे. त्यामुळे बेकायदा बॅनरबाजीमुळे पनवेल पालिकाही राजकीय नेत्यांच्या पावलावर पावले टाकू लागल्याची टीका पनवेलकरांकडून करण्यात येत आहे.>पनवेल महापालिका सार्वजनिक हितासाठी फलक प्रसिद्ध करत असेल, तर त्याला अनधिकृत म्हणता येणार नाही. महापालिका सार्वजनिक हितासाठी काम करते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक हिताच्या गोष्टी प्रसिद्ध करू शकते.- जमीर लेंगरेकर, पालिका उपायुक्त, पनवेल महापालिका> पालिकेने स्वच्छतेबाबत प्रबोधन करणारे लहान-मोठे बॅनर्स परिसरात झळकविले आहेत. आयुक्तांनी पनवेल बॅनरमुक्त करण्याचे आदेश दिले असताना, पालिकेनेच प्रबोधनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बॅनर झळकविल्याने पनवेल परिसर विद्रूप होऊ लागले आहेत. महापालिका हद्दीतील आदई सर्कल, पंचरत्न हॉटेल, एचडीएफसी सर्कल जवळ, पनवेल रेल्वे स्टेशन, तसेच २९ गावांतील काही ठिकाणी स्वच्छता सर्वेक्षण, तसेच कार्यशाळेची अनधिकृत फलकबाजी पनवेल महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. तर नुकत्याच तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते, त्याचेदेखील अनधिकृत फलक काही ठिकाणी भाजपाकडून उभारण्यात आलेले आहेत. या बॅनरबाजीमुळे पनवेल पालिकाही आता राजकीय नेत्यांच्या पावलावर पावले टाकू लागल्याची टीका पनवेलकरांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई