शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बॅनर्समुळे ३ कोटींचा महसूल बुडाला, पनवेल पालिकेच्या स्थायी समितीत पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:17 IST

Panvel News : अनधिकृत बॅनरमुळे पालिकेचा सुमारे ३ कोटींचा महसूल बुडला आहे. बॅनर लावण्याकरिता पालिकेने नेमलेल्या कंपनीकडून केवळ २० ते २५ लाखांचा निधी मिळत आहे.

पनवेल : अनधिकृत बॅनरमुळे पालिकेचा सुमारे ३ कोटींचा महसूल बुडला आहे. बॅनर लावण्याकरिता पालिकेने नेमलेल्या कंपनीकडून केवळ २० ते २५ लाखांचा निधी मिळत आहे. याचे पडसाद बुधवारी पार पडलेल्या ऑनलाइन स्थायी समितीत उमटले.सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्थायी समिती सभेत मोजकेच विषय मंजुरीसाठी आले होते. त्यापैकी सन २०२०-२०२१ ते २०२१ -२०२२ या कालावधीकरिता पनवेल महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या जनजागृतीबाबत बॅनर छपाई करण्यासाठी पालिकेने काढलेल्या निविदेला अथर्व मीडिया वर्ल्ड या ठेकेदाराने कमी दराची निविदा भरल्याने मंजुरी मिळाली आहे. स्थायी समितीत या विषयाला मंजुरी मिळाली. मात्र, पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनरबाजीमुळे पालिकेचा ३ कोटींपेक्षा जास्त महसूल बुडत असल्याचा आरोप शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला.   तर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अनधिकृत बॅनर वेळेवर काढले जात नसल्याचा आरोप सभागृहात केला. भाजप नगरसेवक  पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने प्रश्न प्रलंबित असताना, मोजकेच विषय स्थायी समिती समोर घेतले जात आहेत. यामुळे पालिकेच्या अर्थसंकल्पातील निधी शिल्लक राहत असल्याचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. सभापती संतोष शेट्टी यांच्याकडून सर्व विषय मंजूर करण्यात आले.

या विषयांना मिळाली मंजुरी  पालिकेचे उपशिक्षक ज्ञानेश्वर आलदर यांच्या अपील अर्जावर सुनावणी मंजूर पूर्वाश्रमीच्या २३ ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना पालिका अधिनियमानुसार वैद्यकीय खर्चची प्रतिपूर्ती रक्कम मंजूर करणे. मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करणे.कब्रस्तानजवळील ते दुकान रद्द करावेसध्या मालमत्ता कर हेच उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. अशा परिस्थितीत कोरोडो रुपयांच्या निधीवर पालिका पाणी सोडत असेल, तर हे गंभीर असल्याचे मत अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केले. मुकीत काझी यांनी कब्रस्तानजवळ पालिकेने नव्याने बियर शॉपीला परवानगी दिली. पालिकेने पुनर्विचार करून परवानगी रद्द करण्याची मागणी केली. याबाबत माहिती घेऊन सविस्तर माहिती दिली जाईल, असे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी सांगितले.

टॅग्स :panvelपनवेल