शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

उमेदचा ‘बायर सेलर मीट’ एक अभिनव उपक्रम:  एकनाथ डवले

By कमलाकर कांबळे | Updated: October 4, 2023 21:16 IST

बुधवार ४ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी बेसिक्स च्या सहाय्याने राज्यस्तरीय ‘बायर सेलर मिट’ चे आयोजन करण्यात आले होते.

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई :  मोठ्या कंपन्या आणि खरेदीदार यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे राबविण्यात आलेला ‘बायर सेलर मीट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार असून उमेदच्या  स्वयंसहायता गटाच्या महिलांच्या कृषी व बिगर कृषी उत्पादनांना शास्वत बाजारपेठ मिळवून देणाऱ्या ‘बायर सेलर मीट’ या नाविण्यपूर्ण उपक्रमाला  उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.  असे प्रतिपादन ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव  एकनाथ डवले यांनी व्यक्त केले. 

बुधवार ४ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी बेसिक्स च्या सहाय्याने राज्यस्तरीय ‘बायर सेलर मिट’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य परिचालन अधिकारी  परमेश्वर राउत, अवर सचिव धनवंत माळी उपसंचालक शीतल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. देशभरातील प्रमुख ४१ साखळी व्यवसाय कंपन्यांचे प्रतिनिधींसह राज्यभरातून स्वयंसहाय्यता गटाच्या आणि शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये २८ करार या कार्यक्रमात संपन्न झाले. यावेळी प्रधान सचिव  एकनाथ डवले म्हणाले की, ग्रामविकास विभाग उमेद अभियानाच्या माध्यमातून  ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वायत्त होण्यासाठी अनेक प्रकारे मदत करत आहे. आमच्या महिलांची उत्पादने दर्जेदार आहेत, गुणवत्तापूर्ण आहेत. आता त्यांना शास्वत बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. साखळी व्यावसायिक आणि मोठमोठ्या कंपन्यांनी पुढे येऊन या महिलांना सक्षम बनण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.   

ग्रामीण भागातील उमेदच्या महिलांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असल्याने त्यांनी उत्पादित केलेले कृषी आधारित उत्पादने वेगवेगळ्या कंपनी किंवा साखळी व्यावसायिक यांनी घाऊक प्रमाणात खरेदी करून शेतामालाला चांगला परतावा मिळावा हा  या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.  राज्यभरातील ३४ जिल्ह्यातून उमेद अंतर्गत कार्य करत असलेल्या महिलांच्या प्रतिनिधी आपल्या उत्पादनाच्या किंवा शेतमालाच्या नमुन्यासह  या कार्यक्रमास उपस्थित होत्या. या मीट  मध्ये सोयाबीन, मिरची, हळद, तूर, हरभरा, मका, बाजरी, नाचणी, ज्वारी  यासारखे दर्जेदार धान्य आणि कडधान्य तसेच मसाले, गुळ, मध, फळे, वनौषधी, तेलबिया इत्यादी उत्पादने नमुना स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले होते. खरेदीदार म्हणून ३० पेक्षा जास्त संस्था आणि कंपन्या यांचे प्रतिनिधी हजर होते. सेंद्रिय आणि शुद्धता असलेले उत्पादने महिलांनी उपलब्ध करून दिल्यामुळे खरेदीदार संस्था आणि कंपन्यांच्या प्रतिनिधी यांनी करार करण्यासाठी उत्साह दाखवला. या कार्यक्रमात खरेदीदार यांनी दाखविलेल्या रुचीमुळे भविष्यात महिलांना शास्वत बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbusinessव्यवसाय