शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘उज्ज्वला’ योजना गॅसवरून पुन्हा चुलीवर; गृहखर्च भागवताना गृहिणींची मात्र तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:27 IST

पनवेल तालुक्यातील परिस्थिती : गृहखर्च भागवताना गृहिणींची मात्र तारांबळ

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात महागाईने डोके वर काढल्याने नागरिक हतबल झाले आहेत. पेट्रोल, डिझेलबरोबर गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने  गृहिणींची गृहखर्च सांभाळताना तारांबळ उडत आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरची होणारी भाववाढ न परवडणारी झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील  गृहिणींच्या घरी आता गॅस बंद करून  पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात आहे. 

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून अनेकांना गॅस देण्यात आले आहेत. पनवेल तालुक्यात आजघडीला  ४ हजार  ७०० उज्ज्वला गॅसचे लाभार्थी आहेत. त्यानुसार घरातील गृहिणींकडून चूल बंद करून गॅसवर स्वयंपाक तयार करण्यात येऊ लागला आहे. 

कोरोनामुळे अगोदरच  काम मिळत नाही. रोजगार कुठे मिळेल याचीच चिंता सतावत असते. सकाळी उठल्यावर कामाच्या शोधात दिवस जातो. काम न मिळाल्याने पोट भरायचे वांधे झाले आहेत.  सरकारने गॅस दिला, पण सिलिंडर भरण्यासाठी झालेल्या  भाववाढीमुळे गृहिणी  हतबल झाल्या आहेत. वर्षभरात गॅसच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे मिळालेल्या रोजगारातून महागाईवरच खर्च होत असल्याची खंत महिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

महिलांची चुलीच्या  धुरापासून मुक्ती झाल्याने  गृहिणींना दिलासा  मिळाला. परंतु हे सुख जास्त दिवस टिकले नाही. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. महागाई वाढल्याने घर चालवणे मुश्कील झाले आहे. त्यात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे गॅस खरेदी करणे आता महिलांना न परवडणारे आहे. त्याकरिता घरातील गॅस बंद करून पुन्हा चूल पेटवली जात आहे. लाकडाचे इंधन वापरून स्वयंपाक बनवला जात आहे. महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल