शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका

By नामदेव मोरे | Updated: April 23, 2025 02:20 IST

नवी मुंबईमधील उद्धव सेना, काँग्रेस व शरद पवार गटाच्या १३ नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली...

नवी मुंबई : उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत अडकला आहे. तीन हजार कोटी प्रत्येक वर्षी खड्यात घातले जात होते. आम्ही आता त्यांचा धंदा बंद केला आहे. आम्ही रस्ते धुतले त्यांनी मुंबईची तिजोरी धुतली अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

नवी मुंबईमधील उद्धव सेना, काँग्रेस व शरद पवार गटाच्या १३ नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राजा का बेटा राजा नही बनेगा जो मेहनत करेगा वही राजा बनेगा. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे सर्व जण आपले सवंगडी आहेत. उबाठा सवंगड्यांना घरगडी समजत होते. महानगरपालिकांमध्येही युतीचा भगवा फडकेल. राज्यात सर्वत्र पक्षामध्ये प्रवेश करणारांची रीघ लागली आहे.मुंबईमध्ये आतापर्यंत ६५ जणांनी प्रवेश केला आहे. उबाठाने स्वार्थासाठी विचारांशी फारकत घेतली. फक्त आरोप करण्याशिवाय ते काहीच करत नाहीत. विधानसभेला आरोपांचा किस पाडून फक्त २० जागा जिंकल्या. आपण ६० जागा जिंकल्याचे त्यांनी सांगितले.नवी मुंबईमधील माथाडीसह एलआयजी घरांवर कारवाई होऊ दिली जाणार नाही. कंडोनियम अंतर्गत कामांसाठी विशेष निधी दिला जाईल. कार्यकर्त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहणार आहे. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहनही शिंदे यांनी केले. यावेळी आमदार शरद सोनावणे, उपनेते विजय नाहटा, विजय चौगुले, खासदार नरेश म्हस्के, जिल्हा प्रमुख किशोर पाटक, द्वारकानाथ भोईर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.दहशतवादी हल्याचा निषेधकाश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमीत शहा या हल्याला जशास तसे उत्तर देतील. देशवासीयांच्या मनात पाकिस्तानविषयी चीड निर्माण झाली असून भारतीय जवान चोख उत्तर देतील अशी भुमीका एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे