शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ढिसाळ कामाविरोधात लाक्षणिक उपोषण

By admin | Updated: August 4, 2016 02:06 IST

नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी अनेकदा पत्र पाठवून लक्ष वेधूनही पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष चालविले आहे.

उरण : उरण शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी अनेकदा पत्र पाठवून लक्ष वेधूनही पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष चालविले आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात उनप अपयशी ठरल्याचा आरोप करीत उरण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शहर अध्यक्ष किरीट पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (३) आयोजित उपोषणात अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.उरण शहरातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावित आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था, शौचालयाची समस्या, अपुरा पाणीपुरवठा, गटार आणि आरोग्याचे प्रश्न, कासमनगर, मीना हाऊसिंग सोसायटी, पांडुरंग अपार्टमेंट, समर्थ अपार्टमेंट, बोरी, मोरा विभागातील विविध नागरी समस्यांबाबत पालिकेशी अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आलेला आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा काँगे्रसचा आरोप आहे. उनपने चालविलेल्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणकर्त्यांची कामगार नेते महेंद्र घरत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी, मिलिंद पाडगावकर, माजी शहर अध्यक्ष गणेश सेवक, अय्याझ फ की, कमलाकर घरत, संध्या ठाकूर, नगरसेवक महेंद्र कांबळे, माजी नगरसेवक हेमंत पाटील आदि काँग्रेस पदाधिकाऱ्यांबरोबरच राष्ट्रवादी, शेकापच्या पदाधिकाऱ्यांनीही भेटी देवून पाठिंबा दिला असल्याची माहिती शहर अध्यक्ष किरीट पाटील यांनी दिली. उपोषणकर्त्यांकडे नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने नागरिकांच्या समस्यांबाबत प्रशासन आणि सत्ताधारी गंभीर नसल्याचा आरोपही किरीट पाटील यांनी केला. (वार्ताहर)>शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था, शौचालयाची समस्या, अपुरा पाणीपुरवठा, गटार आणि आरोग्याचे प्रश्न, कासमनगर, मीना हाऊसिंग सोसायटी, पांडुरंग अपार्टमेंट, समर्थ अपार्टमेंट, बोरी, मोरा विभागातील विविध नागरी समस्यांबाबत पालिकेशी पत्रव्यवहार झाला आहे.