शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:38 IST

भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालकासह दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पामबीच मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

पनवेल : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालकासह दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पामबीच मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. कारची अतिवेगात दुचाकीला धडक बसल्याने पलटी होवून हा भीषण अपघात झाला.पामबीच मार्गावर एनआरआय वसाहतीसमोरील सिग्नललगत शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. वाशी येथे नोकरी करणारा रुबेन शिंदे (२५) हा मोटारसायकलने कळंबोली येथील राहत्या घराच्या दिशेने चालला होता. तो एनआरआय वसाहतीसमोरील सिग्नलपासून पुढे जाताच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने त्याला धडक दिली. यावेळी कार अतिशय वेगात असल्याने शिंदे हा दुचाकीसह काही अंतरापर्यंत फरफटत गेला, तर दुचाकीला धडकल्यानंतर कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून अनेक पलट्या खावून पडली. या भीषण अपघातामध्ये कारमधील राहुल पाटील (३७) याच्यासह दुचाकी चालक रुबेन शिंदे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. राहुल पाटील याने अतिवेगात कार पळवल्याने हा भीषण अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींकडून अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु दोघांनाही रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राहुल पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील व पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचे सख्खे चुलत बंधू होते. पामबीच मार्गावर यापूर्वी देखील वेगमर्यादा तोडल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतरही रात्री कारचालकांच्या बेशिस्तीमुळे असे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Accidentअपघात