शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दोन टँकरची धडक, आठ तास वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:10 IST

सायन-पनवेल महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी या मार्गावरील कोपरा उड्डाणपुलावर डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला होता.

पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी या मार्गावरील कोपरा उड्डाणपुलावर डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला होता. अगदी याच घटनेची पुनरावृत्ती शुक्र वारी पहाटे ५.३० च्या दरम्यान घडली. डिझेल व डांबराची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरमध्ये धडक बसल्याने खारघर टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणारा मार्ग ठप्प झाला होता. या अपघातांमुळे टँकरमधील डांबर रस्त्यावर सांडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.विशेष म्हणजे, या मार्गाच्या मधोमध अपघातग्रस्त टँकर बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. खारघर स्पेगेटी बस स्थानकापासून हिरानंदानी उड्डाणपुलापर्यंत सुमारे तीन कि. मी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर डांबर सांडल्याने दुचाकींचाही या वेळी अपघात झाला. याच मार्गावर हिरानंदानी उड्डाणपुलावर कारने टेम्पोला धडक दिल्याने नजीकच्या अंतरावर अपघाताची दुसरी घटना घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी कारचे नुकसान झाले. महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. २०१६ ते २०१८पर्यंत अद्याप ९५ जणांना या मार्गावर अपघातांमुळे आपले जीव गमवावे लागल्याची माहिती, माहिती अधिकारात दीपक सिंग या आरटीआय कार्यकर्त्याने उघड केली. विशेष म्हणजे, या मार्गावर पथदिवे नसल्याने अनेक अपघात रात्री व पहाटेच्या सुमारास घडत असतात. वाहनचालकांना समोरील वाहने अंधारामुळे दिसत नसल्यानेच अशाप्रकारे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. टोलनाक्याजवळ झालेल्या अपघातामुळे वाहतूककोंडी सुरळीत होण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागला. खारघर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे हे पहाटेपासून घटनास्थळी उपस्थित होते.सिग्नल यंत्रणा बंदसायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणाºया ठेकेदाराने अद्याप सिग्नल बसविले नाहीत. सानपाडा, नेरूळ, सीबीडी, खारघर येथे सिग्नल नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. खारघरमध्ये सकाळी व सायंकाळी प्रचंड वाहतूककोंडी होत असून वाहतूक पोलिसांना जादा मनुष्यबळ उपलब्ध करावे लागत आहे. सिग्नल नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.महामार्ग अंधारातमहामार्गावरील बहुतांश विद्युत दिवे बंद आहेत. अंधार असल्यामुळे वाहनचालकांना समोरील वाहनांचा व रोडवरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अंधारामुळे पहाटेच्या वेळी अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. खारघरमध्ये झालेला अपघातही अपुºया प्रकाशामुळे झाल्याचे बोलले जात आहे.अर्धवट राहिलेली कामेमहामार्गावर तुर्भे येथील उड्डाणपुलाचे काम अर्धवट राहिलेले आहे. नेरूळ ते उरण फाटा दरम्यानच्या पादचारी भुयारी मार्गांचे काम महापालिकेने केले आहे; परंतु सीबीडीच्या पुढील भुयारी मार्गांचे काम रखडले असून नागरिकांना धोकादायकपणे रोड ओलांडावा लागत आहे.पावसाळ्यात अपघात वाढणारपाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात महामार्गावर दोन गंभीर अपघात झाले आहेत. महामार्गावरील रखडलेली कामे. सिग्नल यंत्रणेचा अभाव व अंधारामुळे पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई