शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वाशी स्थानकातील दोन आरक्षण खिडक्या बंद; प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:15 IST

कर्मचाऱ्यांकडून मनमानी होत असल्याचा आरोप

नवी मुंबई : लांबपल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्या तिकिटासाठी वाशी रेल्वे स्थानकात चार खिडक्या आहेत. मात्र, अनेकदा एक किंवा दोनच खिडक्या सुरू असतात. विशेषत: गर्दीच्या वेळी हा प्रकार सर्रास घडत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गैरसोय होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.वाशी स्थानकात लांबपल्ल्याच्या रेल्वे आरक्षणासाठी चार खिडक्या आहेत. यापैकी एक चौकशी विंडो आहे. तर उर्वरित तीन खिडक्या तिकीट आरक्षणासाठी आहेत. वाशी स्थानक मुंबई व ठाणे या शहराच्या दृष्टीने मध्यवर्ती आहे. तसेच विविध कामाधंद्यानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. या पार्श्वभूमीवर तिकीट आरक्षणासाठी वाशी स्थानक सोयीची ठरते. त्यामुळे या स्थानकात तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. मात्र, हमखास गर्दीच्या वेळी येथील चारपैकी दोन खिडक्या बंद ठेवल्या जातात. त्यामुळे उर्वरित दोन खिडक्यासमोर नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागतात.यासंदर्भात कोणी विचारणा करण्याचा प्रयत्नही केला तरी तेथील कर्मचाºयांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे आरक्षण खिडक्या असूनही नागरिकांचा खोळंबा होत आहे. येथील कर्मचाºयांच्या मनमानीमुळेच हा त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाºयांना समज द्यावी किंवा अनियमितपणे खिडक्या बंद ठेवण्याचे प्रयोजन काय असते, हे तरी उघड करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.