अलिबाग : ४० लाख रुपयांच्या दरोड्यातील पोलिसांना गुंगारा देणारे मुनीरा दापोलकर, साहील दापोलकर यांना गुरु वारी श्रीवर्धन आराटी येथून अटक केली. मुनीराकडून सुमारे एक लाख सहा हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.काही दिवसांपूर्वी अलिबाग येथे एका व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यांच्याकडील ४० लाख रु पयांवर दरोडा टाकण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये पोलीसच आरोपी होते. तीन पोलिसांनी आधीच अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना शुक्र वारी न्यायालयात हजर करण्यात येणार, असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)
अलिबाग दरोड्यातील आणखी दोघांना अटक
By admin | Updated: January 13, 2017 04:27 IST