शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

महापालिकेला दोन नवीन पुरस्कार

By admin | Updated: May 6, 2017 06:29 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये केंद्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या नवी मुंबई महापालिकेचा राज्य शासनानेही गौरव केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये केंद्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या नवी मुंबई महापालिकेचा राज्य शासनानेही गौरव केला आहे. राज्यात सर्वाधिक कर वसुली व कचरा वर्गीकरणामध्ये उत्तम कामगिरी केल्याप्रकरणी पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त रामास्वामी एन. यांनी पत्रकार परिषद घेवून पालिकेला केंद्र शासनाने व राज्य शासनाने दिलेल्या दोन पुरस्कारांविषयी माहिती दिली. केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला देशात ८ वा व पश्चिम विभागातील प्रथम क्रमांक मिळाला. पहिल्या दहा शहरांमध्ये राज्यातील एकमेव शहर आहे. केंद्र शासनाबरोबर राज्य शासनानेही नवी मुंबईचा सन्मान केला आहे. महापालिकेने घनकचरा वर्गीकरणामध्ये केलेल्या कामगिरीची दखल घेवून विशेष सन्मान केला आहे. केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ चे काटेकोर पालन पालिकेने केले आहे. ओला व सुका कचरा वेगळा केला जात आहे. प्रत्येक सोसायटीला सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचे व ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचे मोठे डबे वितरित केले आहेत. सद्यस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रातून १६५ ते १७५ मेट्रिक टन ओला कचरा व ८० ते ९० मेट्रिक टन सुका कचरा संकलित केला जात आहे. याशिवाय हरित कचऱ्याचे सरासरी प्रमाण ५० मेट्रिक टन एवढे आहे. याशिवाय पालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालून २८२ ठिकाणी कारवाई केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून १५ लाख ५६ हजार इतकी दंड वसुली व प्लास्टीक जप्त करण्यात आले असून याची दखल घेवून राज्य शासनाने पालिकेचा गौरव केला आहे. महापालिकेने महसूल संकलनामध्येही राज्यात सर्वात चांगली कामगिरी केली आहे. स्थानिक संस्था बंद केल्यानंतरही महापालिकेने २०१५ - १६ मध्ये तब्बल ८७० कोटी कर वसुली केली होती. २०१६ - १७ या आर्थिक वर्षामध्ये एलबीटीच्या माध्यमातून तब्बल १०२२ कोटी ४१ लाख रूपये वसुली केली आहे. यापूर्वीच्या थकबाकीदारांकडून ७० कोटी रूपये वसूल करण्यात यश मिळविले आहे. मालमत्ता कर विभागानेही गतवर्षीच्या ५०७ कोटीमध्ये १४० कोटीची भर टाकून तब्बल ६४७ कोटी रूपये कर वसूल केला आहे. या कामगिरीची दखल घेवून शासनाने प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या वेळी सभागृहनेते जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेने केलेल्या कामाची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. स्वच्छतेमध्ये देशात ८ वा क्रमांक मिळाला असून भविष्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. - सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबईस्वच्छ भारत अभियानामध्ये मिळालेले यश लोकप्रतिनिधी, प्रशासन व नागरिकांचे आहे. सर्वांनी संघटितपणे काम केल्यामुळे महापालिकेला देशपातळीवर नावलौकिक मिळाला. राज्य शासनानेही दोन पुरस्कार दिले आहेत. भविष्यात अधिक चांगले काम केले जाईल. - रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई