शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

योजनेचे दोन लाख लाभधारक

By admin | Updated: October 17, 2015 01:58 IST

सामान्य, गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतमजूर, शेतकरी यांचे जीवनमान सुधारावे व त्यांना जीवनात सुरक्षितता लाभावी म्हणून केंद्र शासनाने गेल्या १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभरात

जयंत धुळप, अलिबागसामान्य, गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतमजूर, शेतकरी यांचे जीवनमान सुधारावे व त्यांना जीवनात सुरक्षितता लाभावी म्हणून केंद्र शासनाने गेल्या १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभरात लागू केलेल्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेंतर्गत दोन लाख ४४ हजार २३५ लाभधारकांची नोंदणी झाली आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे काम विविध राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून करण्यात येत असून, या योजनेच्या यशस्वितेसाठी सर्व बँका सक्रिय सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ७० हजार ५५, बँक आॅफ इंडियाने ४२ हजार २६९, बँक आॅफ महाराष्ट्रने २५ हजार ३४६, स्टेट बँक आॅफ इंडियाने २४ हजार १५५, देना बँकेने १८ हजार २७३, आयडीबीआय बँकने १४ हजार २२५, युनियन बँक आॅफ इंडियाने ८ हजार ८८६ , बँक आॅफ बडोदाने ९ हजार १९४, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ४ हजार ०५०, सिंडिकेट बँकने ३ हजार ६३०, इंडियन ओवरसिस बँकेने ४ हजार १५, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सने ३ हजार ४५३, कॉर्पोरेशन बँकने २ हजार ७७३, अ‍ॅÞक्सिस बँकेने २ हजार ५०९, आयसीआयसीआय बँकेने १ हजार ८२०, कॅनरा बँकेने १ हजार ५५१, पंजाब नॅशनल बँकेने १ हजार ७९६, स्टेट बँक आॅफ हैदराबादने १ हजार ४१३, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेने १ हजार ३२१, युको बँकने ८९०, विजया बँकेने ५४७, एचडीएफसी बँकेने ५००, फेडरल बँकेने ३७८, रत्नाकर बँकेने २७, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १ हजार १५९ असे जिल्ह्यात एकूण २ लाख ४४ हजार २३५ लाभधारक पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत सहभागी झाले आहेत.सामान्य नागरिकांना सुरक्षा मिळावी, एखाद्या अपघाताने त्यांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये, त्यांना मदत मिळून त्यांचे जीवन सावरावे यासाठी पंतप्रधान सुरक्षा योजना राबविण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. केवळ १२ रुपये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे. मात्र दरवर्षी नूतनीकरण आवश्यक राहणार आहे. बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. १८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीला आधार क्रमांकाद्वारे योजनेत सहभागी होता येते. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाऊन, पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मेपर्यंत देणे आवश्यक राहणार आहे.