शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पैशांच्या वाटणीवरून दोन भावांमध्ये हाणामारी, १० जणांविरुद्ध गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 02:18 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी झालेल्या भूसंपादनाच्या मोबदल्यातील रकमेच्या वाटणीवरून दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबांमध्ये हाणामारी होण्याचा प्रकार महाड तालुक्यातील शिंदेकोंड येथे घडला

महाड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी झालेल्या भूसंपादनाच्या मोबदल्यातील रकमेच्या वाटणीवरून दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबांमध्ये हाणामारी होण्याचा प्रकार महाड तालुक्यातील शिंदेकोंड येथे घडला. या प्रकरणी दोन्ही भावांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्यानंतर, एमआयडीसी पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.शिंदेकोंड येथील अनिल बबन शिंदे आणि विजय बबन शिंदे या दोन भावांच्या जमिनीचे महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. या पोटी मिळालेल्या मोबदल्याच्या वाटणीवरून दोन भावांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत.रविवारी सायंकाळी दोघांच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाले आणि वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात काही महिलांचे सोन्याचे दागिने, एक मोबाइल फोन गहाळ झाला असून एका मिनीडोर रिक्षाचीही मोडतोड झाली आहे. या प्रकरणी अनिल शिंदे आणि विजय शिंदे या दोघांनीही परस्परविरोधी तक्र ारी सोमवारी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केल्या.अनिल शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार विजय बबन शिंदे, रंजना विजय शिंदे आणि पांडुरंग बबन शिंदे यांच्याविरोधात तर विजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार अनिल बबन शिंदे, राकेश दत्ताराम शिंदे, शर्मिला अनिल शिंदे, अतिष अनिल शिंदे, अंकिता अनिल शिंदे, सुनंदा दत्ताराम शिंदे, रेश्मा राकेश शिंदे अशा दहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा