शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

स्थायी सामित्यांवरून भाजपाचे दोन नगरसेवक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:08 IST

शहर महापालिकेच्या विषय समिती सभापतीपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र या स्थायी सामित्यांवरून भाजपचे दोन नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जात आहे.

मयूर तांबडेपनवेल : शहर महापालिकेच्या विषय समिती सभापतीपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र या स्थायी सामित्यांवरून भाजपचे दोन नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे मनोहर म्हात्रे व एकनाथ गायकवाड हे दोन नगरसेवक नाराज आहेत. एकनाथ गायकवाड यांनी खांदा वसाहत भाजप शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिलेला आहे.पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे आरोग्य, महिला व बालकल्याण, वित्त, सांस्कृतिक कार्यक्र म व क्र ीडा, समाजकल्याण झोपडपट्टी सुधार या समित्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांचा समावेश होणार आहे. याशिवाय प्रभाग समिती समित्यांचेही सभापती व उपसभापती यांची निवड केली जाणार आहे. पालिकेच्या सभागृह नेतेपदी परेश ठाकूर यांची नियुक्ती केली गेली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपने वर्चस्व राखले.स्थायी समितीवर भाजपच्या वाट्याला १० तर शेकाप आघाडीला ६ जागा मिळाल्या होत्या. भाजपकडून स्थायी समितीवर नगरसेवक परेश ठाकूर, संतोष भोईर, नेत्रा पाटील, रामजी बेरा, अमर पाटील, गोपीनाथ भगत, कुसुम म्हात्रे, मनोहर म्हात्रे, संजय भोपी, तेजस कांडपीळे यांची निवड झाली. तर शेकाप आघाडीकडून नगरसेवक प्रीतम म्हात्रे, डॉ सुरेखा मोहोकर, गिरीश केणी, भारती चौधरी, गोपाळ भगत, सतीश पाटील यांची निवड झाली. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हाती असलेले पद म्हणून स्थायी समिती सभापतीकडे पहिले जाते. त्यामुळे या पदावर आपलीच वर्णी लागावी यासाठी भाजपमधून अनेक जण इच्छुक होते.स्थायी समिती सभापतीपदी कळंबोली येथील नगरसेवक अमर पाटील यांना संधी देण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र या पदावरून भाजपचे मनोहर म्हात्रे व एकनाथ गायकवाड हे दोन नगरसेवक नाराज झाले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलहाला सुरु वात झाली असल्याचे दिसून येत आहे.अमर पाटील यांच्या नावाला भाजपमधूनच विरोध होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत भाजपचे नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अमर पाटील यांचे नाव न घेता स्थायी समितीच्या सभापतीच्यासह्या घेण्यासाठी मुंबईच्या बारमध्ये जावे लागेल, असा टोलालगावला.