शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे एमआयडीसीमध्ये तिहेरी हत्याकांड, लुटीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 05:00 IST

तुर्भे एमआयडीसी येथील भंगाराच्या गोडाऊनमधील तिघा कामगारांच्या हत्येची घटना घडली आहे.

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथील भंगाराच्या गोडाऊनमधील तिघा कामगारांच्या हत्येची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असता, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातोड्याने तसेच धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या झाली असून, लुटीच्या उद्देशाने हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.तुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी भागात हा प्रकार घडला आहे. तिथल्या अब्दुल स्क्रॅब ट्रेडर्स या भंगाराच्या गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या तिघा कामगारांची हत्या झाली आहे. राजेश पाल (३०), नौशाद खान (१९) व व इर्शाद खान (१९) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी नौशाद व इर्शाद हे भाऊ आहेत.राजेश, नौशाद, इर्शाद हे तिघेही झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करून हत्या झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तर यामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या सहभागाचीही शक्यता नाकारता येत नाही.शनिवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सदर भंगाराच्या गोडाऊनचे मालक नसीम हे त्या ठिकाणी आले असता, कामगारांच्या राहण्याच्या जागेत तिघांचेही मृतदेह आढळून आले. हातोड्याने व कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्यानंतर मृतदेह तिथल्या खाटेखाली ठेवण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी गोडाऊनच्या गल्ल्यातील काही रक्कमही चोरीला गेल्याचे समोर आले. त्यावरून तिघांची हत्या लुटीच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, गुन्हेगारांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांनी सांगितले.>रहिवाशांनी केली होती तक्रारतिहेरी हत्याकांडाच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर परिसरात मोकळ्या मैदानामध्ये अनधिकृत भंगाराचे गोडाऊन चालवले जात आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा परिसरात वावर वाढत आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासनांकडे तक्रारही केलेली आहे. पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.