शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे एमआयडीसीत कंपनीला आग, रिअ‍ॅक्टरमध्ये स्पार्क झाल्याने घडली दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:39 IST

रिअ‍ॅक्टरमध्ये स्पार्क होऊन कंपनीला आग लागल्याची घटना तुर्भे एमआयडीसीमध्ये घडली. कंपनीत अति ज्वलनशील रसायन असल्यामुळे आगीमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. तत्पूर्वी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य हानी टळली.

नवी मुंबई : रिअ‍ॅक्टरमध्ये स्पार्क होऊन कंपनीला आग लागल्याची घटना तुर्भे एमआयडीसीमध्ये घडली. कंपनीत अति ज्वलनशील रसायन असल्यामुळे आगीमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. तत्पूर्वी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य हानी टळली.रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तुर्भे एमआयडीसीमधील प्रीसीज कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली. कंपनीत एपीआय व हॅक्झॉन या दोन रसायनांवर रिअ‍ॅक्टरमध्ये प्रक्रिया सुरू होती. या दरम्यान स्पार्क झाल्याने आग लागून ती कंपनीत पसरली. आग लागल्याचे समजताच कंपनीतील कामगारांनी बाहेर पळ काढला. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. कंपनीत अति ज्वलनशील रसायन असल्यामुळे आग भडकल्यास परिसरातील इतरही कंपन्यांना धोका निर्माण झाला होता; परंतु कंपनी पूर्णपणे काचेने बंदिस्त असल्यामुळे आग विझवण्याच्या कामात अग्निशमन दलाला अडथळा निर्माण झाला होता. अखेर दर्शनी भागातील काही काचा फोडून त्यामधून फोम व पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली. तत्पूर्वी पोलिसांनीही खबरदारी म्हणून परिसरातील वाहतूक बंद करून शेजारच्या कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. याच परिसरातील मोडेप्रो कंपनीला दोन महिन्यांपूर्वी रविवारच्या दिवशीच आग लागल्याची घटना घडली होती.सुट्टीच्या दिवशी कंपनीत तज्ज्ञ कामगार नसतानाही रिअ‍ॅक्टर सुरू ठेवले जात असल्याने आगीच्या घटना घडत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआग