शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे एमआयडीसीच्या कंपनीला आग, तब्बल ५८ कामगार थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 08:20 IST

आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ, वाशी, कोपरखैरणे येथील अग्निशमन दलासह एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीमधील कापड कंपनीला आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. ही घटना वेळीच लक्षात  आल्याने कंपनीतील ५८ कामगार लगेचच कंपनीबाहेर धावले, त्यामुळे ते थोडक्यात बचावले. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, रात्री उशिरा आग नियंत्रणात आल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत कूलिंगचे काम सुरू होते.

आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ, वाशी, कोपरखैरणे येथील अग्निशमन दलासह एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आगीमुळे इतर कंपन्यांना धोका असल्याने तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील कंपन्यांमधील कामगारांना बाहेर सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कंपनीत कपड्याच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून दर्जेदार कपडा बनविण्याचे काम केले जाते. याच्या प्रक्रियेदरम्यान आग लागल्याची शक्यता आहे. आग आटोक्यात आल्यानंतर उशिरापर्यंत कूलिंगचे काम सुरू होते, असे अग्निशमन विभागाचे प्रमुख शिरीष आरदवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMIDCएमआयडीसी