शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

तुर्भेत मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, एपीएमसीमध्ये गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 03:29 IST

तुर्भे गावामध्ये बुधवारी रात्री अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई : तुर्भे गावामध्ये बुधवारी रात्री अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी दिवसभर पोलिसांनी परिसरामध्ये झाडाझडती सुरू केली होती.रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन मुलीला वडिलांनी बोलावले असल्याचे सांगून माता बाल रूग्णालय परिसरामध्ये नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरोपीच्या हाताला चावा घेवून स्वत:ची सुटका करून घेतली. या घटनेविषयी माहिती मिळताच तुर्भे परिसरामध्ये खळबळ उडाली. गावातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. ही घटना गंभीर असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एपीएमसी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात विनयभंग व अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दिवसभर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त तुषार दोशी, परिमंडळ एकचे उपआयुक्त, सहायक आयुक्त, नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी परिसराची पाहणी केली. गावामधील सीसीटीव्हीचे फुटेजही ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपीचा तपास सुरू केला आहे. स्थायी समितीच्या माजी सभापती नगरसेविका शुभांगी पाटील, शशिकला पाटील, भाजपा नगरसेवक रामचंद्र घरत, माजी नगरसेवक विवेक पाटील, सामाजिक कार्यकर्ते भोलानाथ पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनीही पोलिसांना तपासासाठी आवश्यक सीसीटीव्हीचे चित्रीकरण मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. गुरुवारी दिवसभर शोधकार्य सुरू होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे, नेरूळ व इतर परिसरामध्ये मुलींचा विनयभंग झाल्याच्या व छेडछाडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामधील दोन संशयितांची छायाचित्रेही पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. यामधीलच एका आरोपीने हा गुन्हा केला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तुर्भे गावामध्ये घडलेल्या घटनेविषयी विनयभंग व अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दिवसभर परिसरातील सीसीटीव्हीचे छायाचित्रण ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.- सतीश निकम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसीअल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ही गंभीर घटना असून पोलिसांनी आरोपीला लवकर पकडून कडक शासन करावे, अशी मागणी आम्ही केली आहे.- रामचंद्र घरत,नगरसेवक, भाजपातुर्भे गावामध्ये बुधवारी रात्री मुलीची छेड काढण्याची घटना घडली आहे. याविषयी सर्व ग्रामस्थांनी पोलिसांना तत्काळ माहिती देवून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना आवश्यक सीसीटीव्हीचे चित्रीकरण उपलब्ध करून देण्यासाठीही सहकार्य केले असून आरोपीला लवकर पकडावे अशी मागणी केली आहे.- निशांत भोलानाथ पाटील,पदाधिकारी, राष्ट्रवादी काँगे्रस

टॅग्स :Crimeगुन्हा