शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 02:22 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील शहरांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात अव्वल स्थान प्राप्त करून

अलिबाग : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील शहरांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात अव्वल स्थान प्राप्त करून कोट्यवधी रुपयांची घसघसशीत बक्षिसे पदरात पाडून घेण्यासाठी संबंधित प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सरकारी, तसेच खासगी इमारतीच्या संरक्षक भिंती पर्यावरणपूरक आणि स्वच्छतेचा चित्रमय संदेश रेखाटून रंगवण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पनवेल महापालिका अमृत, तर नऊ नगरपालिका या नॉनअमृत गटात मोडतात. अशा सर्व ठिकाणी भिंती रंगवण्याचे काम करण्यात येते आहे.गेली काही वर्षे स्वच्छता अभियानाबाबत विविध कामे सुरू होती. काही ठिकाणी ती अजूनही प्रगतिपथावर आहेत. केंद्र सरकारने आता या अभियानाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.अमृत शहरे आणि नॉनअमृत शहरे, अशा दोन गटांतून जास्त मार्क मिळवणाºया शहरांना २० कोटी रुपयांपासून पाच कोटी रुपयांचे, असे एकूण ४८० कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका अमृत शहरांमध्ये, तर उर्वरित नऊ नगरपालिका या नॉनअमृत गटात मोडत आहेत. स्वच्छ भारत मिशन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांशी प्रकल्पांपैकी एक आहे. देशात राबवण्यात आलेला हा प्रकल्प महाराष्ट्रातही राबवण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांतील नागरिकांचा सांघिक सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती निर्माण करण्याकरिता केंद्र सरकार देशातील चार हजार ४१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्वेक्षण करणार आहे. अमृत शहरे आणि नॉनअमृत शहरे अशा दोन गटांमध्ये करण्यात येणार आहे. अमृत शहरांचा गुणानुक्रम हा देश पातळीवर ५०० शहरांमधून करण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील ४३ अमृृत शहरांचा समावेश आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण सहभाग राहणार आहे. नॉनअमृत शहरांची विभागणी पाच विभागांमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचा समावेश पश्चिम विभागात करण्यात आला आहे. त्यासोबतच गुजरात सारख्या राज्याची कडवी झुंज राहणार आहे. मध्यप्रदेश आणि गोवा राज्येही त्यांच्या जोडीला आहेत. दीव-दमण हा केंद्र शासित प्रदेशही स्पर्धेत राहणार आहे. या सर्व राज्यांतील एक हजार १७ शहरांना स्पर्धेत स्थान आहे.नुसत्या भिंती रंगवून शहरातील अस्वच्छता झाकली जाणार नाही. त्यासाठी शहरातील गल्लीबोळात जमा होणारा कचरा तातडीने उचलणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे, असा नागरिकांमधून सूर उमटत आहे.