शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपच्या माध्यमातून आता स्वमग्नतेवर उपचार

By admin | Updated: April 9, 2017 02:55 IST

स्वमग्नता हा एक प्रमुख मज्जातंतूचा तसेच मनावर आघात करणारा बालरोग असून, भारतात २५० पैकी एका मुलाला हा रोग होतो. मुंबईतील न्यूरोजेन ब्रेन अ‍ॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूट

नवी मुंबई : स्वमग्नता हा एक प्रमुख मज्जातंतूचा तसेच मनावर आघात करणारा बालरोग असून, भारतात २५० पैकी एका मुलाला हा रोग होतो. मुंबईतील न्यूरोजेन ब्रेन अ‍ॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूट उपचार केंद्राच्या वतीने शनिवारी सीवूड येथे ‘स्पीच प्ले’ नावाचे अ‍ॅप विकसित केले असून, लोकार्पण करण्यात आले. संवाद आणि उच्चारातील अडथळे दूर करणाऱ्या या अ‍ॅपच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आॅटिझमविषयी जनजागृती गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. अ‍ॅपच्या माध्यमातून उपचार पद्धतीने अधिक सुलभरीत्या करता येणे शक्य झाल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमात आॅटिझम झालेल्या मुलांच्या पालकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले, तसेच पालकांमध्ये जनजागृतीकरिता मार्गदर्शनपर पुस्तिकेचे प्रकाशनही या ठिकाणी करण्यात आले. आॅटिझम हा एक मज्जारज्जूसोबत निगडित असा विकार असून, यामध्ये भाषीय संवाद नसणे, खूप प्रमाणात उतावीळ होणे, हालचाली करणे, अतिशय राग येणे, सामाजिकरीत्या एकत्र न येणे आदी लक्षणे पाहायला मिळतात. भारतातील सुमारे एक कोटी मुले या विकारावर उपचार घेत आहेत. जनजागृतीअभावी आॅटिझम झालेल्या मुलांची बालकाला भाषा आणि तिचे उच्चारण विकसित होत असल्याचा असंतोष न्यूरोजेन ब्रेन अ‍ॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अलोक शर्मा यांनी व्यक्त केला. मात्र, ‘स्पीच प्ले’ या अ‍ॅपच्या माध्यमातून पालकांना चांगलाच फायदा होणार असून घरबसल्या वाणी वरील उपचार करता येणे शक्य झाले आहे, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदिनी गोकुळचंद्रन यांनी बोलीभाषा शिकविण्याकरिता या अ‍ॅपचा उपयोग होणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी ३००हून अधिक स्वमग्न विद्यार्थी, पालक उपस्थित होते.