शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

मुंबई-दिल्ली फ्रेट कॅारिडोरला गती देण्यासाठी कोकण आयुक्तांच्या समितीचा उतारा

By नारायण जाधव | Updated: February 18, 2023 19:54 IST

राज्यातील काम कूर्म गतीने : भूसंपादनासह आरओबीच्या कामांना वेग मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देशात रेल्वेद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीत मैलाचा दगड ठरणारा जेएनपीटी ते दादरीमार्गे दिल्ली डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामाला गती देण्यासाठी गृह विभागाने शु्क्रवारी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टास्क समितीचा उतारा शोधला आहे. ही समिती या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे जलद गतीने भूसंपादन करून रेल्वे वाहतूक गतीने होण्यासाठी आरओबी बाधंणे, जलवाहिन्या आणि वीजवाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.....माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने या महामार्गाला मंजुरी दिली. त्यानंतर नरेंद्र माेदी सरकारच्या काळात या मार्गाला गती देण्यात आली आहे. हा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीत मैलाचा दगड ठरणार असल्याने त्यावर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. विविध देशांतून समुद्रमार्गे जेएनपीटीत येणाऱ्या मालाची उत्तर भारतात वेगाने वाहतूक करण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो वेळेत पूर्ण करण्याचा आग्रह पंतप्रधान कार्यालयाने धरला आहे.राज्यात १७६ किमी लांबीया कॉरिडाॅरचे जेएनपीटी ते दादरीपर्यंतचे अंतर १५०४ किलोमीटर आहे. राज्यातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून हा मार्ग जात आहे. राज्यातील त्याची लांबी १७६ किलाेमीटर इतकी आहे. मात्र, राज्यात त्याचे काम कूर्मगतीने सुरू असल्याचे मुख्य सचिवांनी १५ फेब्रुवारी २०२३ रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत निदर्शनास आले. त्यानुसार या कामाला गती देण्यासाठी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.१६ अधिकाऱ्यांचा समितीत समावेशया समितीत कोकण आयुक्तांसह रायगड, ठाणे आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, कल्याण-डोंबिवली महापालिका, कोकण विभागाचे पुनर्वसन विभागाचे उपायुक्त, वेस्टर्न आणि दक्षिण डेडिकेटेड कॉरिडाॅर कार्पोरेशनचे महाव्यवस्थापक, कार्यकारी संचालक, रस्ते विकास महामंडळासह मध्य रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणे, रायगड, पालघर या तिन्ही जिल्ह्यांचे कार्यकारी अभियंता आणि मुख्य वन संरक्षक ठाणे अशा १६ जणांचा समावेश आहे.ही कामे वेळेत करण्याचे निर्देशही समिती मुंबई-दिल्ली फ्रेट काॅरिडाॅरला लागणाऱ्या खासगी, शासकीय जमिनीसह वन जमिनीचे भूसंपादन जलद गतीने करणे, बाधितांना मोबदला देऊन संबंधित जमीन वेळेत हस्तांतरित करणे, वीजवाहिन्या, जलवाहिन्यांच्या स्थलांतराला गती देणे, आरओबी बांधण्यासाठी जमीन हस्तांतरित करणे अशी कामे जलद गतीने कशी होतील, यासाठी प्रयत्न करणार आहे. याशिवाय दर १५ दिवसांनी कामाचा आढावा घेण्यास समितीला सांगण्यात आले आहे.३०४३ खारफुटी तोडण्यास मंजुरीजेएनपीटी ते दादरी या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरकरिता यापूर्वी २०१४मध्ये सात वर्षांकरिता सीआरझेडचे ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यावेळी ५४३ खारफुटीच्या कत्तलीस मान्यता मिळाली होती. मात्र, मधल्या काळात आलेल्या कोविडमुळे काम रखडले. त्यातच सीआरझेडच्या ना-हरकत प्रमाणपत्राची मुदत नोव्हेंबर २०२१मध्येच संपली. यामुळे पुन्हा नव्याने ती वाढवून मिळण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरने अर्ज केला आहे. या दरम्यान बाधित होणाऱ्या खारफुटींची संख्या ३,०४३ झाली असून, ती ताेडण्यासही मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२२मध्ये परवानगी दिली आहे.दररोज १० हजार कंटेनरची होणार वाहतूकया मार्गावरील एका मालवाहू रेल्वेची ४०० ट्रकच्या समतुल्य भार वाहून नेण्याची असणार आहे. अशा २५ रेल्वे दररोज १० हजार कंटेनर क्षमतेची मालवाहतूक करू शकतात. यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दररोजच्या १० हजार ट्रकला लागणाऱ्या इंधनाची बचत होणार आहे.पाच कोटी वृक्षांची लागवडया फ्रेट कॉरिडॉरच्या मार्गाआड येणाऱ्या वृक्षांचीही मोठ्या संख्येने कत्तल झालेली असून, पुढच्या टप्प्यात ती आणखी होणार आहे. ही भरपाई भरून काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या १,४८३ किमी मार्गाच्या दुतर्फा पाच कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला आहे.