शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पणत्या, मॅजिक लॅम्पला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 04:51 IST

मातीच्या पणत्यांना मोठी मागणी : पाच ते १०० रुपये प्रतिनगापर्यंत या वस्तूंची विक्री

पनवेल : आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, फटाक्यांची आतशबाजी म्हणजे दिवाळी. चिनी बनावटीच्या वस्तूंनी दिवाळीची बाजारपेठ काबीज केल्याची ओरड होत असली, तरी आजही पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याला प्राधान्य देणारा मोठा वर्ग आहे. बाजारात आकर्षक, रंगबिरंगी पणत्या विक्रीसाठी उपलब्ध असल्या तरी मातीच्या पणतींची मागणी कायम आहे.पनवेलमधील युसूफ मेहरअली सेंटरमध्ये पारंपरिक बनावटीच्या विविध वस्तूंना पसंती दर्शवण्यात येत आहे. दिवाळीमध्ये आकर्षक नावीन्यपूर्ण मातीच्या पणत्या या ठिकाणी तयार केल्या जात आहेत. कर्नाटकमधील पेरेकोटा मातीपासून युसूफ मेहरअली सेंटरमध्ये निसर्गदीप (मॅजिक लॅम्प) बनविले जातात. या दिव्यांमध्ये सुमारे ५० ग्रॅम तेल राहते. विशेष म्हणजे, सुमारे आठ तास हा दिवा तेवत राहतो. मॅजिक लॅम्पची मागणी वर्षानुवर्षे वाढत असून, सुमारे ४५०० ते ५००० नग मुंबई, पुणे, वाशी, मालाड, पेण या ठिकाणी दिवाळीपूर्वी पाठविले जातात. अवघा पाच रुपये प्रतिनग ते १०० रुपये प्रतिनगापर्यंत या वस्तूंची विक्री केली जाते.मॅजिक लॅम्पची निर्मिती करणारे प्रकाश तांबे सांगतात की, दिवाळीपूर्वी तीन महिने पणत्या बनविण्यास सुरुवात करतो. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध आकारातील पणत्या बनवतो. यामध्ये लीप पणत्या, साध्या पणत्या, बेस पणती, फ्लॉवर पॉट आदी बनविले जात असल्याचे तांबे यांनी सांगितले.रोजगार निर्मितीयुसूफ मेहरअली सेंटरमध्ये बनविल्या जाणाऱ्या अनेक वस्तू टिकाऊ आहेत. यामुळे अनेकांना रोजगाराची संधी निर्माण होत असते. मात्र, या वस्तूंची जाहिरात होत नसल्याची खंत हस्तकलाकार प्रकाश तांबे यांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांना प्रशिक्षणयुसूफ मेहरअली सेंटर मार्फत नवी मुंबई, पनवेलमधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पणत्या बनविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षक शिबिर आयोजित केली जातात. या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पणत्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

टॅग्स :DiwaliदिवाळीNavi Mumbaiनवी मुंबई