शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बच्चे कंपनी, हो जाओ तैयार! चार उद्यानांत टॉयट्रेन पुन्हा धावणार

By नामदेव मोरे | Updated: January 4, 2024 16:27 IST

महानगरपालिकेने सुरू केली कार्यवाही.

नामदेव मोरे, नवी मुंबई : कोरोनापासून महानगरपालिकेच्या चार उद्यानांमधील टॉय ट्रेन बंद आहे. टॉय ट्रेनची सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. देखभालीसह चालविण्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपविण्यात येणार असून, यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.            नवी मुंबई महानगरपालिकेने नेरूळमधील संत गाडगेबाबा उद्यान, वाशीमधील मीनाताई ठाकरे उद्यान, ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व दिघा येथील बालमित्र साने गुरुजी उद्यानामध्ये टॉय ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनापूर्वी ही सुविधा सुरळीतपणे सुरू होती. कोरोनाकाळात बंद झालेली ट्रेन पुन्हा सुरळीत सुरू झाली नाही. उद्यानामध्ये येणारी मुले टॉयट्रेनमध्ये बसण्याचा हट्ट करतात; पण ती बंद असल्यामुळे हा हट्ट पालकांना पुरविता येत नाही. महानगरपालिकेने पुन्हा टॉय ट्रेन सुरू करावी, अशी मागणीही केली जात होती; परंतु विविध कारणांनी ट्रेन सुरू होत नव्हती.            महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मुलांसाठी टॉयट्रेन पुन्हा सुरू करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. विभागप्रमुखांच्या बैठकीमध्येही याविषयी पाठपुरावा केला होता. प्रशासनाने टॉयट्रेनची देखभाल व व्यवस्था पाहण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे.

उद्याननिहाय टॉयट्रेन- 

उद्यान - आसनक्षमतासाने गुरुजी उद्यान दिघा - १६डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ऐरोली - १६मीनाताई ठाकरे उद्यान, वाशी - २०संत गाडगेबाबा उद्यान, नेरूळ - १६

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका