लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देश-विदेशांतील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांना निसर्गरम्य पर्यटनस्थळांपुरते मर्यादित न राहता शहरांमध्येही ‘टूरिस्ट होम’, ‘होम स्टे’, ‘पर्यटन व्हिला’ आणि ‘पर्यटक अपार्टमेंट’ स्वरूपात राहण्याची सुसज्ज आणि संस्कृतीशी जोडलेली निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. पर्यटन संचालनालयाच्या या नव्या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील शहरांनाही आता पर्यटनाचा दर्जा प्राप्त होणार आहे.
पर्यटन संचालनालयाच्या या उपक्रमामुळे देश-विदेशांतील पर्यटकांना शहरातील जीवनशैली, संस्कृती, परंपरा, स्थानिक मराठमोळे स्वयंपाक आणि घरगुती पाहुणचाराचा अनुभव घेता येणार आहे. घरच्या गप्पा-गोष्टी आणि कुटुंबातील संवाद यामुळे पर्यटकांचा प्रवास अधिक संस्मरणीय ठरणार आहे. या योजनेंतर्गत कोकण विभागात नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक नागरिक व पर्यटन व्यावसायिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रादेशिक पर्यटन कार्यालयाच्या प्र. उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे. यात घराच्या काही खोल्या पर्यटकांना देऊन उत्पन्नाचा स्रोत निर्माण करता येतो. सर्वसामान्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पर्यटन व्यवसायाला चालनापर्यटन व्यवसायात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘टूरिस्ट होम’ आणि ‘होम स्टे’ नोंदणीसाठी अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याद्वारे पर्यटन व्यवसाय अधिक सुसंगत व विश्वासार्ह होईल. ही योजना स्थानिक रोजगार निर्मितीचे एक प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त केला करण्यात आला आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्येशहरांमध्ये ‘टूरिस्ट होम’, ‘होम स्टे’, ‘पर्यटन व्हिला’, ‘अपार्टमेंट’ नोंदणीयस्थानिक नागरिकांना पर्यटन व्यवसायात सहभागी होण्याची संधीमराठमोळ्या पाहुणचाराचा अनुभव देश-विदेशांतील पर्यटकांना मिळणारकोकण विभागात अर्ज नोंदणी सुरू