शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीतील खाडीकिनारचे कांदळवन बनले पर्यटनस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:39 IST

विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे दर्शन : जैवविविधता केंद्रामुळे पर्यटकांमध्ये उत्साह; बोट सफारीचा आनंद

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : वन खात्यामार्फत ऐरोलीत उभारण्यात आलेले जैवविविधता केंद्र पर्यटकांसाठी सुवर्णपर्वणी ठरत आहे. त्या ठिकाणी प्रतिदिन सुमारे ६० ते ७० पर्यटक येत असून मागील दीड वर्षात २२ हजार ५०० जणांनी केंद्राला भेट दिली आहे. त्यापैकी बहुतांश पर्यटक बोट सफरीच्या माध्यमातून सुमारे २५० प्रजातीच्या पक्ष्यांपैकी ऋतूनुसार दिसणारे पक्षी नजरेत कैद करण्याच्या उद्देशाने येत असतात.पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी शासनातर्फे ऐरोली येथील खाडीकिनारी फ्लेमिंगो अभयारण्य संवर्धन करण्यात आले आहे. त्याकरिता किनारी व सागरी जैवविविधता केंद्र तयार करण्यात आले आहे. ठाणे ते वाशी दरम्यानच्या खाडीकिनारी भागात दृष्टीस पडणाऱ्या पक्ष्यांची माहिती देण्यात आली आहे, तर काही पक्षी व माशांच्या प्रतिकृतीही मांडण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षांत सुमारे २२ हजार ५०० पर्यटकांनी या केंद्राला भेट दिली आहे.

पर्यटकांचा उत्साह लक्षात घेऊन वनखात्यातर्फे काही महिन्यांपासून त्या ठिकाणी बोटिंगची सोयही करण्यात आली आहे. साधारण एका तासाच्या या बोट सफरीच्या माध्यमातून ऐरोली ते वाशीपर्यंतच्या कांदळवनातील पक्षी पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे, त्यामुळे बोट सफरीसाठी येणाºया पर्यटकांच्याही संख्येत वाढ होत चालली आहे. ठाणे ते वाशी दरम्यानच्या खाडीमध्ये २५० पेक्षा जास्त प्रजातीचे पक्षी पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये फ्लेमिंगोसह वूड सॅण्डपायपर व इतर देश विदेशातील स्थलांतरित तसेच स्थानिक पक्ष्यांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांश पक्षी ऋतूनुसार नजरेस पडणारेही आहेत.

जैवविविधता केंद्रात ब्ल्यू व्हेल माशाचा ४० फुटांचा सांगाडा ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक योग्य ती तयारी त्या ठिकाणी सुरू आहे. त्याशिवाय पर्यटकांना अधिकाधिक वेळ खिळवून ठेवण्यासाठी, तसेच त्यांच्या विरंगुळ्यासाठी जर्मनच्या तंत्रज्ञानावर आधारित उद्यान उभारले जाणार आहे. पुढील काही महिन्यांत या दोन्ही बाबींची त्या ठिकाणी भर पडलेली असेल, यामुळेही नवी मुंबईकरांना कांदळवन पर्यटनासह विरंगुळ्याचीही सोय उपलब्ध होणार आहे.

ब्ल्यू व्हेल माशांचा ४० फुटांचा सांगाडाजैवविविधता केंद्रातील नावीन्यात भर टाकण्यासाठी त्या ठिकाणी ब्ल्यू व्हेल माशाचा सांगाडा ठेवला जाणार आहे. सुमारे ४० फुटांचा हा अवाढव्य सांगाडा पाहण्यासाठी पर्यटकांची रिग लागण्याची शक्यता येत्या काळात आहे. या दरम्यान पर्यटकांच्या विरंगुळ्याची सोय म्हणून केंद्राच्या मागच्या जागेतच जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आकर्षक उद्यान उभारले जाणार आहे.

विविध पक्षी व समुद्री जीवांची माहिती देणारे हे जैवविविधता केंद्र सुट्टीचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुले असते. याच कालावधीत बोटीद्वारे कांदळवनातील पक्षी पाहता येतात. याकरिता पूर्वनोंदणी आवश्यक असून, ओहोटीच्या वेळी मात्र ही सुविधा बंद असते. जैवविविधता केंद्र उभारल्यापासून त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी सुरूच आहे. प्रतिदिन सुमारे ६० ते ७० नागरिक त्या ठिकाणी भेट देत आहेत. मागील दीड वर्षांत या केंद्राला २२ हजार ५०० पर्यटकांनी भेट देऊन शासनाच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

पक्षीअभ्यासकांसह शालेय विद्यार्थ्यांचे आकर्षणाचे केंद्र22,500 पर्यटकांनी दीड वर्षात दिली भेट250 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईtourismपर्यटन