नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक आठवड्यात टोमॅटोचे भाव किलोमागे १६ ते ३४ रुपयांवरून २६ ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ८० रुपयांवर गेले. एक आठवड्यात दर दुप्पट झाले आहेत. शेवगा, भेंडी व गवारचे दरही वाढले आहेत. वाटाणा, कोबी, फ्लॉवरसह पालेभाज्यांचे दर मात्र नियंत्रणात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यात टोमॅटोचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीमध्ये बुधवारी १८६ टन टोमॅटोची आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाल्याने दर आठवडाभरात दुप्पट झाले. रोज दरात वाढ होत आहे. किरकोळ मार्केटमध्येही दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीमध्ये ४४६ टन वाटाण्याची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे दर ५० ते ७० रुपये किलोवरून ३० ते ४० रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे.
होलसेल व किरकोळ मार्केटमधील दरवस्तू होलसेल किरकोळटोमॅटो २६ ते ६० ६० ते ८०भेंडी ५२ ते ७० १०० ते १२०गवार ७० ते १०० १४० ते १६०शेवगा शेंग १६० ते २०० ३२० ते ४००वाटाणा ३० ते ४० ६० ते ७०कोबी १० ते १६ ४० ते ५०फ्लॉवर १० ते १४ ४० ते ६०दुधी भोपळा १६ ते २४ ५० ते ६०
किरकोळ मार्केटमध्ये पालक जुडी ३० रुपये
भाजीपाल्याच्या दरातही घसरण झाली आहे. किरकोळ मार्केटमध्ये कोथिंबीर जुडी २० रुपये, मेथी २०, पालक व शेपू ३० रुपये जुडी दराने विकली जात आहे. पालेभाज्यांसह अनेक वस्तूंचे दर कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Web Summary : Tomato prices doubled in a week. Guwar, okra, and drumstick prices rose. Pea and leafy vegetable prices dropped, offering consumers relief. Wholesale and retail rates varied significantly.
Web Summary : एक सप्ताह में टमाटर के दाम दोगुने हो गए। ग्वार, भिंडी और सहजन के दाम बढ़े। मटर और पत्तेदार सब्जियों के दाम गिरे, जिससे उपभोक्ताओं को राहत मिली। थोक और खुदरा मूल्यों में काफी अंतर रहा।