शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

महामार्ग हस्तांतरणाचा तिजोरीवर भुर्दंड, टोल वसुली ठेकेदाराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:13 IST

वाशी ते बेलापूर दरम्यान १४ किलोमीटरचा सायन - पनवेल महामार्ग हस्तांतर करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : वाशी ते बेलापूर दरम्यान १४ किलोमीटरचा सायन - पनवेल महामार्ग हस्तांतर करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या रोडवरील दिवाबत्ती, देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पालिकेवर येणार असून वर्षाला करोडो रुपये खर्च करावे लागणार आहेत. पालिकेच्या तिजोरीवर भुर्दंड पडणार असून खारघर टोलचे उत्पन्न मात्र ठेकेदाराच्या खिशात जाणार आहे.वाहतूककोंडी व अपघात कमी व्हावे यासाठी शासनाने २५ किलोमीटर लांबीच्या सायन - पनवेल महामार्गाचे रूंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. १२०० कोटीपेक्षा जास्त खर्च करून रूंदीकरण करण्यात आले असून ६ जानेवारी २०१५ पासून खारघरमध्ये टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. ठेकेदाराने ८० टक्के काम पूर्ण केले असून उर्वरित २० टक्के काम अद्याप पूर्ण केलेले नाही. शासनाने टोलमधून लहान वाहनांना सूट दिल्यामुळे नुकसान होत असल्याचे कारण देवून त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. रखडलेल्या कामांमुळे महामार्गावरील प्रवाशांना प्रचंड गैरसोयींना सामोेरे जावे लागत आहे. तुर्भे पोलीस स्टेशनजवळील पादचारी पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. शिरवणे, नेरूळ, उरण फाटाजवळील पादचारी भुयारी मार्गांचे काम अर्धवट राहिले आहे. कामोठेजवळ रूंदीकरणाचे व भुयारी मार्गांचे कामही रखडले आहे. पावसाळ्यात पडलेले खड्डेही ठेकेदार वेळेत दुरूस्त करत नाही. यामुळे जून ते आॅगस्ट दरम्यान वाशी ते बेलापूर दरम्यान रोज प्रचंड वाहतूककोंडी होवू लागली होती. महामार्गावरील पथदिवेही वारंवार बंद असल्यामुळे अपघातांमध्ये वाढ होवू लागली होती. महामार्गावरील प्रवास म्हणजे डोकेदुखी ठरू लागली होती. रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्याप्रमाणात डेब्रिज टाकले जात असल्यानेही पालिकेसाठी डोकेदुखी ठरू लागली होती. फिफाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने महामार्गावर सुशोभीकरणाची कामे केल्यामुळे हा रोड हस्तांतर करून घेण्याची मागणी होवू लागली होती.महापालिकेने नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. महामार्गावरील जंगली झाडेझुडपे, डेब्रिज, खड्डे, बंद पथदिवे यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. देखभाल दुरूस्तीसाठी महापालिका शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत असते. परंतु निधी नसल्याचे कारण देवून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नाही. यामुळे महामार्ग हस्तांतर करून घेतल्यास त्याची योग्य देखभाल करणे महापालिकेला शक्य होईल. साफसफाई, खड्डे, दिवाबत्ती, भुयारी व पादचारी मार्गांचे देखभाल करणे महापालिकेला शक्य होणार आहे. वास्तविक महामार्गाचे रूंदीकरण करण्याचा ठेका सायन-पनवेल टोलवेज कंपनीला दिला आहे. टोल ठेकेदार वसूल करणार व ६० टक्के रोडची देखभाल दुरूस्ती महापालिका करणार हे विसंगत असल्याचे स्पष्ट होत असून पालिकेला करोडोेचे नुकसान होणार आहे.मनपा क्षेत्रातून १४ किलोमीटर लांबीचा सायन - पनवेल महामार्ग जात आहे. त्याची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. ठेकेदाराच्या माध्यमातून या रोडचे रूंदीकरण करण्यात आले असून खर्च वसुलीसाठी खारघरमध्ये टोल बसविण्यात आला आहे. टोल वसुली ठेकेदार करणार व ६० टक्के रोडची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी करोडो रूपये पालिका खर्च करणार आहे. हा भुर्दंड पालिकेने का सहन करायचा, हस्तांतर करायचेच असेल तर टोलमधील उत्पन्नही पालिकेला मिळाले पाहिजे, अशी मागणी होवू लागली आहे.रखडलेली कामेकोण पूर्ण करणार?महामार्गावर तुर्भे पोलीस स्टेशनजवळील पादचारी पुलाचे काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे. सर्वच पादचारी भुयारी मार्गांचे काम रखडले आहे.रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये खर्च होणार आहेत.पालिकेने हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली तर रखडलेली कामे कोण करणार असा प्रश्नही उपस्थित होवू लागला आहे.६ उड्डाणपुलांचा समावेश : महापालिका क्षेत्रामध्ये महामार्गावर वाशी, सानपाडा, सानपाडा दत्तमंदिर, नेरूळ, उरण फाटा व बेलापूर असे सहा मोठे उड्डाणपूल आहेत. याशिवाय वाशी व शिरवणेमध्ये दोन छोटे पूल आहेत. वाशी, दत्तमंदिर, नेरूळ व सीबीडीमधील पूल जुने असून भविष्यात त्यांचे दुरूस्ती किंवा पुनर्बांधणी करायची वेळ आली तर हजारो कोटी रूपयांचा भुर्दंड पालिकेवर पडणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई