शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

नाका कामगारांवर उपासमारीची वेळ, घरात अन्नाचा कण नसल्याने कामाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 07:31 IST

Navi Mumbai :कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने काही मजुरांनी पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला. शासनाने बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली तरी बिगारी, मजूर, गवंडी, रंगारी, लादी कारागीर फारसे मिळत नाहीत.

नवी मुंबई : पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन महिन्यांपूर्वी आलेल्या नाका कामगारांनी नवी मुंबईतील नाके पुन्हा गजबजले होते. परंतु आता १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ठेकेदारांची दैनंदिन कामे ठप्प झाल्याने अनेक नाका कामगारांनी गावची वाट धरली आहे. मात्र, ज्यांना गावी जाण्यासाठी तिकिटाला पैसेही नाहीत, अशा नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने काही मजुरांनी पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला. शासनाने बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली तरी बिगारी, मजूर, गवंडी, रंगारी, लादी कारागीर फारसे मिळत नाहीत. ठेकेदारांना कामासाठी २० ते २५ मजूर लागतात. मात्र अनेक जणांनी गावचा रस्ता धरल्याने उर्वरित कामगार नाक्यावर कामाच्या शोधात दिवसभर बसून असतात. किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी  तुर्भे, कोपरखैरणे, नेरूळ एलपी, घणसोली, नोसिल नाका, ऐरोली सेक्टर ३ या नाक्यांवर मजूर मिळेनासे झाले आहेत. जे आहेत ते एक-दोन तासांच्या छोट्या कामासाठी येत नाहीत. संपूर्ण दिवसाच्या आठ तासांच्या कामाची मजुरी ६०० ते ७०० रुपये घेतली जाते. महिला बिगारी ५०० ते ५५० रुपये, गवंडी (कडिया)ची मजुरी १००० ते १२०० रुपये असून लादी बसविणारा कारागीर १२०० ते १५०० ब्रास १०० चौ. फुटासाठी घेतो.

पूर्वीसारखी मोठी कामे हल्ली मिळत नाहीत. दोन-चार दिवसांच्या कामानंतर पुन्हा नवे काम शोधावे लागते. त्यात कंत्राटदारांकडेही पुरेसे काम नाही. प्रत्येक जण आर्थिक विवंचनेत असल्याने लोक घराचे बांधकाम, रंगरंगोटी, सुशोभीकरण टाळत होते. त्यामुळे मजुरांना काम मिळेनासे झाले.- आनंद परमेश्वर, बांधकाम ठेकेदार, साठेनगर, रबाले

तीन-चार दिवसांपूर्वी नाका कामगारांची गर्दी असायची. आता प्रत्येक नाक्यावर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके कमी दोन-चार मजूर उभे असतात. आम्हालाही पैशांची गरज असल्याने छोट्या-मोठ्या कामावर दिवस ढकलण्यापेक्षा जास्त मजुरी मिळेल तीच कामे स्वीकारतो. परंतु दोन दिवसांपासून कामे मिळत नसल्याने आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.- वसंत पिठोले, नाका कामगार, त्र्यंबकेश्वर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई