शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

टाटा यार्डमधील माथाडींवर उपसामारीची वेळ, यार्ड भाड्याने दिल्याने कामच मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 03:24 IST

कळंबोली येथील टाटा स्टील यार्ड हे दुसऱ्या दोन कंपनीला भाडेतत्त्वावर दिल्याने या ठिकाणी काम करणा-या ३७५ माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : येथील टाटा स्टील यार्ड हे दुसऱ्या दोन कंपनीला भाडेतत्त्वावर दिल्याने या ठिकाणी काम करणा-या ३७५ माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला कामच मिळत नसल्याने उदरनिर्वाह करायचा कसा? हा प्रश्न या कामगारांनी उपस्थित केला आहे.लोह-पोलाद मार्केटच्या बाजूला टाटा स्टील कंपनीने २८ एकरांवर यार्ड तयार केले होते. सिडकोकडून लीजवर जागा घेऊन कंपनीने येथे स्टील यार्ड तयार केले होते. जमशेदपूर येथून वॅगने हा माल कळंबोलीतील यार्डमध्ये येत होता. येथून तो माल इतर ठिकाणी पाठवला जात असे. त्यामुळे येथे माथाडींना चांगला रोजगार मिळत असे. कळंबोलीत राहणारे ५०० पेक्षा जास्त जण येथे काम करीत होतो; परंतु २००१ मध्ये टाटा कंपनीने या ठिकाणची लोखंडाची ने-आण बंद केली आणि ही जागा आय. के. मरिन व गेट वे अ‍ॅन रेल्वे यांना संयुक्त भागीदारीत भाडेतत्त्वावर दिली. ते देतअसताना माथाडी कामगारांना जास्तीत जास्त काम ही कंपनी देईलअसे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात आमच्या पदरात काहीच पडले नसल्याचे बंडू धायगुडे यांनी सांगितले. त्या वेळी कामगारांनी आंदोलनसुद्धा केले, त्याची दखल घेत जमशेदपूर येथून कंपनीचे प्रतिनिधी येथे आले आणि त्यांची माथाडी बोर्डावर बैठक झाली. मात्र, दिलेल्या आश्वासनाची १८ वर्षांनंतरही पूर्तता झाली नसल्याची माहिती राम महानवर यांनी दिली.ज्या कंपनीला ही जागा भाडेतत्त्वावर दिली आहे, ते येथे कंटनेर यार्ड तसेच इतर कामासाठी त्याचा वापर करीत आहेत. प्रत्यक्षात माल या यार्डात उतरत नाही त्यामुळे ३७५ कुटुबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा प्रश्न कळंबोलीतील स्थानिक नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांनी गेल्या दोन वर्षांपासून हाती घेतला आहे.जवळपास १८ वर्षांपासून आपल्या हातांना काम मिळेल या आशेवर माथाडी कामगार आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. टाटा आणि आय के मरिन या कंपनीची उच्चस्तरीय बैठक लावण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरूच ठेवणार आहे.- मोनिका प्रकाश महानवर,नगरसेविका, पनवेल महापालिकाआमच्या कंपनीलाही या ठिकाणी काम करायचे आहे. त्या दृष्टिकोनातून संचालक टाटा स्टील कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाली तर येथे मोठ्या प्रमाणात मालाची चढ-उतार होईल आणि माथाडी कामगारांना कामसुद्धा मिळेल.- शत्रुघ्न देशमुख,- पर्यवेक्षक, आय के मरिन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई