शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ५० हजार मुलांना टायफॉइडची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:24 IST

शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद; महापौरांसह आयुक्तांकडून केंद्रांची पाहणी

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने १४ जुलै ते २५ आॅगस्ट दरम्यान महानगरपालिका क्षेत्रात टायफॉइड कंज्युगेट लसीकरण अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत ४९,११२ मुलांना लस देण्यात आली असून आयुक्तांसह महापौरांनी शहरातील केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी रविवारी सिटी हॉस्पिटल, कोपरखैरणे येथे लसीकरण बुथला भेट देऊन बुथ मांडणी, साहित्य मांडणी, सिरिंजचा साठा, लसीची शीतसाखळी या सर्व बाबींची बारकाईने तपासणी केली, तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांचीही मते जाणून घेत मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, रवींद्र पाटील तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते. अभियानाच्या प्रारंभी १४ जुलै रोजी महापौर जयवंत सुतार यांनीही शिरवणे नागरी आरोग्य केंद्रातील लसीकरण बुथला भेट देऊन पाहणी केली होती. १४ व १५ जुलै या दोन दिवसात नऊ महिने ते १५ वर्र्षांआतील २0 हजार ८३८ मुलांनी लसीकरणाचा लाभ घेतला होता. आता २१, २२ व २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत तीन दिवसात २८ हजार २७४ मुलांनी लसीकरणाचा लाभ घेतला असून अशाप्रकारे एकूण ४९ हजार ११२ लाभार्र्थींनी नेरु ळ से.४८, नेरु ळ फेज १, शिरवणे, तुर्भे, इंदिरानगर, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, चिंचपाडा, दिघा अशा ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात लसीकरणाचा लाभ घेतला आहे.टायफॉइड कंज्युगेट लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून पूर्वपात्रता आहे व जागतिक आरोग्य संघटनेने या लसीची शिफारस केली आहे. आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध हाच उपचार हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ९ महिने ते १५ वर्षांआतील मुलांना ही लस मोफत दिली जात असून यापुढील लसीकरण २८ जुलै रोजी होणार आहे हे लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यातील ११ नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, आपल्या मुलांना टायफॉइडपासून संरक्षित करावे, असे आवाहन महापौर जयवंत सुतार व आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMedicalवैद्यकीय