शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

अशाने नवी मुंबईची ठाणे, कल्याण-डोंबविलीसारखी बजबजपुरी होईल; अतिक्रमण, भूमाफियांना मिळणार बळ

By नारायण जाधव | Updated: November 2, 2023 16:56 IST

नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण आणि भूमाफियांचे मोठे पेव फुटले आहे.

नवी मुंबई : सुनियोजित नवी मुंबईत वाट्टेल तिथे अतिक्रमणे, वाट्टेल तशी अतिक्रमणे करून मोकळ्या जागा काबीज केल्या जात आहेत. भूमाफिया स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून सिडको, महापालिका, एमआयडीसीचे कोट्यवधी रुपये किमतीचे मोकळे भूखंड बळकावीत आहेत. मात्र, याकडे नवी मुंबई महापालिका, सिडकोने अक्षरश: हेतुपुस्सर दुर्लक्ष केले हाेते. मात्र, शहरातील ऑर्केस्ट्रा बार, हॉटेलांमधील वाढीव बांधकामे, तसेच ‘एमपीएमसी’तील व्यापाऱ्यांनी मन मानेल त्या पद्धतीने केलेली अतिक्रमणे हटविण्याची हिंमत नवे उपायुक्त राहुल गेठे यांनी सुरू केली. त्यांच्या कारवाईत मनमानी असेलही; परंतु अतिक्रमणे हटविल्यामुळे थेट सीएमओच्या आदेशानुसार तडकफडकी उचलबांगडी केल्याने अतिक्रमणधारक आणि भूमाफियांनी दिवाळी आधीच दिवाळी साजरी करणे सुरू केले आहे. सीएमओच्या अशा भूमिकेमुळे सुनियोजित नवी मुंबईतील अतिक्रमण माफियांना बळ मिळेल, असा सूर आता उमटू लागला आहे. ‘लोकमत’ने आपल्या मंडे स्पेशलमध्ये ‘अतिक्रमण पाडायचे की कारवाईचा फार्स करायचा’, अशी भीती व्यक्त केली होती. ती आता तंतोतंत खरी ठरली आहे.नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण आणि भूमाफियांचे मोठे पेव फुटले आहे. बेलापूर करावे, नेरूळ, वाशीगाव, जुगाव, कोपरखैरणे-घणसोली, तळवली, गाेठीवली दिवसागणिक मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. खाडीकिनारी ही अवस्था शहरी भागात ऑर्केस्ट्रा, बार, पब, लाॅज, हॉटेल आणि दुकानमालकांनी मार्जिनल स्पेससह मोकळ्या जागेत अतिक्रमण केेले आहे. बांधकामाच्या मूळ आराखड्यात परवानगी न घेता अंतर्गत बदल करून वाढीव बांधकाम करून व्यावसायिक वापर करणे सुरू केले आहे. शीतगृहचालकांनीसुद्धा वेदरशेडच्या नावाखाली व्यावसायिक वापर सुरू केला आहे.

दुकानदार, हॉटेलमालकांनी नको तिथे पावसाळी शेड बांधून वापर सुरू केला आहे. आपल्या आस्थापनांचे नामफलकही मनमानीपणे परवानगी न घेता वाट्टेल तशा प्रकारे लावले आहेत. अशाच काही आस्थापनांवर उपायुक्त गेठे यांनी कारवाई सुरू केली होती. यामुळे हे घटक दुखावले गेले. त्यांच्याच तक्रारीनुसार शहरांतील अनधिकृत बांधकामांना मालमत्ता कर लावून अभय देणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी गेठेंविरोधात ‘ढोल’ पिटल्याने सीएमओने त्यांचा पदभार काढण्याचे आदेश दिल्याची चर्चा आयुक्तांनी तो काढण्याआधीच शहरांत सुरू झाली होती. यामुळे सीएमओवर या माफियांचा प्रभाव किती आहे, हे लक्षात येते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा पदभार काढला गेला.

गेठे यांनी जी कारवाई केली ती सदोषही असेलही कदाचित; परंतु त्यासाठी त्यांना दोन खडेबोल सुनावून सुधारणा करण्यास सांगण्याऐवजी थेट त्यांचा पदभार काढल्याने नवी मुंबईतील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या माफियांना एकप्रकारे बळ मिळाले आहे. अशाने येणारा नवा अधिकारी शहरांतील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे काढण्याऐवजी त्या विभागातील राडे‘रोडे’ गोळा करणाऱ्यांकरवी आपली दुकानदारी सुरू करण्याची भीती आहे. नगरविकासचे असेच धोरण असेल तर सुनियोजित नवी मुंबईची ठाणे, कल्याण-डोंबविली, उल्हासनगर, भिवंडी या ठाणे जिल्ह्यातील शहरांसारखी बजबजपुरी होण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई