शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांचे लेखा परीक्षण रखडले

By admin | Updated: November 15, 2016 04:54 IST

महापालिकेच्या आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता येवू नये व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी मुख्य लेखा परीक्षक हे पद शासनाच्यावतीने नियुक्त केले जाते. परंतु

नामदेव मोरे / नवी मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता येवू नये व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी मुख्य लेखा परीक्षक हे पद शासनाच्यावतीने नियुक्त केले जाते. परंतु तीन वर्षांमध्ये मुख्य लेखा परीक्षक कधी मुख्य लेखा व वित्त अधिकारी तर कधी प्रशासन उपआयुक्तपदावर काम करण्यामध्ये स्वारस्य दाखवत असल्याने मूळ जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. वास्तविक २०१२ - १३ नंतर पालिकेचे लेखा परीक्षणच झालेले नाही व स्वतंत्र लेखा विभाग असतानाही लेखा परीक्षणात त्रुटी आढळून येत असल्याने त्याचा ठपका या विभागावरच ठेवला जावू लागला आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्र व राज्य शासनाचे १३ पुरस्कार मिळालेल्या नवी मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होवू लागले आहेत. शासनाने परिपत्रकाप्रमाणे कोणत्याही आस्थापनावर भ्रष्टाचाराचे किंवा इतर कोणतेही आरोप झाल्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी त्याविषयी सविस्तर वस्तुस्थिती मांडणे आवश्यक आहे. परंतु महापालिका प्रशासनाने दोन महिन्यांपासून एकाही घोटाळ्यावर अधिकृत खुलासा केलेला नसल्याने शहरवासीयांमध्ये उलट - सुलट चर्चा सुरू झाली आहे. आरोप - प्रत्यारोपामध्ये पालिकेच्या लेखा परीक्षण विभागाच्या कामगिरीवरच शंका उपस्थित होवू लागली आहे. महापालिकेचा जमा व खर्च नियमाप्रमाणे झाला की नाही हे पाहण्याचे व तपासण्याची जबाबदारी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांची आहे. महापालिकेमध्ये स्वतंत्र लेखा विभाग असून आॅक्टोबर २०१३ पासून सुहास शिंदे हे मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून काम करत आहेत. घोटाळ्यांची चर्चा सुरू झालेली असताना पालिकेच्या लेखा परीक्षणाविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता २०१२ - १३ पासून पुढे लोकल फंड आॅडिट झालेलेच नाही. तीन वर्षांचे लेखा परीक्षण शिल्लक असल्यामुळे व्यवहारामध्ये नियमितता आहे की अनियमितता हे कसे समजणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.महापालिकेमध्ये होणाऱ्या जमाखर्चाचे नियमित लेखा परीक्षण लेखा विभागाने केले पाहिजे. प्रत्येक खर्च करताना, बिले देताना, वाढीव मुदत व वाढीव रक्कम मंजूर करताना सर्व फाईली योग्य प्रकारे तपासून खर्च झाला तरी लेखा परीक्षणामध्ये आक्षेप येणार नाहीत. पण महापालिकेमधील सर्व विभाग व लेखा परीक्षण यांच्यामध्ये योग्य समन्वयच नाही. लेखा परीक्षकांविषयी नाराजी असल्यामुळे त्याचा परिणाम कामकाजावर होवू लागला आहे. लेखा परीक्षकांनी सर्व हिशेब व माहिती वेळोवेळी स्थायी समितीला दिली पाहिजे. लेखा परीक्षक हे पद स्थायी समितीच्या अधिपत्याखाली असते. लेखा परीक्षकांना स्वतंत्र अधिकार आहेत. त्यांनी लेखा परीक्षणासाठी मागितलेली माहिती देणे आयुक्तांनाही बंधनकारक आहे. पण विद्यमान स्थितीमध्ये लेखा परीक्षकांची स्वतंत्र भूमिका दिसून येत नाही. लेखा परीक्षण विभागाने वेळच्या वेळी हिशेब तपासणी केली तर घोटाळ्याचा प्रश्नच येणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.