शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

पाण्यावर उत्पन्नापेक्षा तिप्पट खर्च

By admin | Updated: March 3, 2016 02:56 IST

पाणी वितरणासाठी येणारा खर्च हा नागरिकांकडून पाणी बिलातून कररूपाने संकलित झाला पाहिजे, असे केंद्र व राज्य शासनाचे निकष आहेत

नामदेव मोरे,  नवी मुंबईपाणी वितरणासाठी येणारा खर्च हा नागरिकांकडून पाणी बिलातून कररूपाने संकलित झाला पाहिजे, असे केंद्र व राज्य शासनाचे निकष आहेत. परंतु पनवेल नगरपालिकेने पाण्यासाठी तिजोरीची दारे सताड उघडी ठेवली असून, उत्पन्नापेक्षा तिप्पट जास्त खर्च केला जात आहे. यावर्षी आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांनीही पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. राज्यातील सर्वच शहरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. स्वमालकीचे धरण असल्याने २४ तास पाणी देणाऱ्या नवी मुंबईमध्येही यावर्षी पहिल्यांदाच पाणीकपात करण्याची वेळ आली. १६४ वर्षांची परंपरा असणाऱ्या पनवेल नगरपालिका क्षेत्रामध्येही तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. केंद्र व राज्य शासनाने पाणीवाटपाविषयी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. पाणी वितरण प्रणालीसाठी जेवढा खर्च होतो तेवढे पैसे पाणीकरातून उपलब्ध झाले पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. परंतु पनवेलमधील वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेने नवीन स्रोत निर्माण करण्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही. यामुळे शेजारील नवी मुंबई महानगरपालिकेने धरण विकत घेतले, परंतु नगरपालिकेने मात्र पाणी विकत घेण्यालाच प्राधान्य दिले. त्याचे गंभीर परिणाम आता शहरवासीयांना भोगावे लागत आहेत. २००९-१० पासून सात वर्षांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी तब्बल ६९ कोटी २५ लाख ७४५० रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नागरिकांकडून पाणीबिलातून फक्त २४ कोटी ५६ लाख ९९ हजार ५६३ रुपये जमा झाले आहेत. एकूण उत्पन्नापेक्षा पाण्यापासून मिळणारे उत्पन्न फक्त चार टक्के आहे, परंतु खर्च मात्र तब्बल १२ टक्के आहे. उत्पन्नापेक्षा खर्च तिप्पट होऊ लागला आहे. पाणी वितरणासाठी खर्च वाढत असला तरी नगरपालिकेने कधीच कंजुषी केली नाही. पाण्यासाठी तिजोरीची दारे सताड उघडीच ठेवली आहेत, परंतु यावर्षी सर्वत्रच टंचाई असल्यामुळे एकदिवसाआड पाणी वितरित केले जात आहे. शहरवासीयांना प्रतिमाणसी २५० ते २६० लिटर पाणी दिले जात होते. आता हे प्रमाण १२५ ते १५० लिटरवर आले आहे. नगरपालिका एमआयडीसी, सिडको व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेत आहे. एक हजार लिटरसाठी साडेनऊ रुपये खर्च करावा लागत आहे. हेच पाणी नागरिकांना अडीच ते तीन रुपये दराने द्यावे लागत आहे. गतवर्षीपर्यंत ९५० रुपये फ्लॅट रेट दराने पाणी दिले जात होते. आता हे दर १,५०० रुपये करण्यात आले आहेत; तरीही उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनही पाण्यावरील आवश्यक तो खर्च करीत आहेत. परंतु यावर्षी पाणीच नसल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाण्याची उधळपट्टी थांबवावी, आवश्यक तेवढेच पाणी वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. पनवेलवासीयांना पुरेसे पाणी मिळेल एवढा पाण्याचा स्रोत नगरपालिकेकडे नाही. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी व सिडकोकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. गतवर्षी पाणी विकत घेण्यासाठी ८ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. पुढील वर्षांच्या अर्थसंकल्पामध्येही सहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नगरपालिका जवळपास ९.५० रुपये दराने पाणी विकत घेत आहे. परंतु नागरिकांना मात्र ३.५० ते ४ रुपये दराने वितरीत केले जात आहे. यामुळेही उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाच विहिरी स्वच्छ करून घेतल्या आहेत. पाणीगळती कमी करण्यावर भर दिला आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन त्याविषयी ठोस पावले उचलली जात आहेत. नागरिकांना पाणी वाचविण्याचे आवाहन केले जात असून, भविष्यात शहरात सर्व नळजोडणीधारकांना मीटर बसविण्याची योजना आहे. - मंगेश चितळे,मुख्याधिकारी, पनवेल नगरपालिका.