शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील ‘त्या’ तीन बेपत्ता मुलींचा शोध

By admin | Updated: August 8, 2016 02:25 IST

शहरातून ४० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तीन मुलींचा शोध लागल्याने पोलिसांची सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या मुली उत्तर प्रदेशातील नई बस्ती झाशी शहर

उरण : शहरातून ४० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तीन मुलींचा शोध लागल्याने पोलिसांची सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या मुली उत्तर प्रदेशातील नई बस्ती झाशी शहर पोलीस ठाण्यात भाड्याच्या घरासाठी पोलीस व्हेरिफिकेशन मिळविण्याच्या प्रयत्नात होत्या.उरण तालुक्यातील नागाव म्हातवली येथील आकांक्षा भरणे (१७) आणि अनुष्का भरणे (१५) या दोघी सख्ख्या बहिणी आणि मैत्रीण सोनल पिंगळे (२१) या तीन मुली २४ जून रोजी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र महाविद्यालयात प्रवेशासाठी सकाळी ११ वा. घराबाहेर पडलेल्या तिघीही मुली उशिरापर्यंत घरी परतल्याच नसल्याने पालकांनी मुली हरविल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. एकाच दिवशी तीन मुली बेपत्ता झाल्याने उरणमध्ये खळबळ माजली होती. पोलिसांनीही तपासासाठी नवी मुंबई आयुक्त हेमंत नगराळे, उपायुक्त विश्वास पांढरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी बुधवंत, उरण वपोनि राजेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शोध कार्यासाठी सहा पथके तयार केली होती. मात्र बेपत्ता मुलींचा मागमूसही लागत नव्हता. मुलींचा शोध युद्धपातळीवर घेण्याचे काम सुरू होते. तरीही तपासाला दिशा मिळेल असा कोणताही धागा हाती आला नव्हता. मुलींचे मोबाइलही बंद असल्याने तपासकामाला गती मिळत नव्हती. त्यामुळे या तीनही मुली उरणमधून ठरवून बेपत्ता झाल्याच्या कयासापर्यंत उरण पोलीस याआधीच पोहोचले होते. मात्र तपास लागत नसल्याने पोलिसांवर टीकेची झोड उठविण्यात येत होती. त्यानंतरही पोलिसांचे शोधकार्य सुरूच होते. दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील नई बस्ती झाशी शहर पोलीस ठाण्यातून उरणच्या बेपत्ता तीन मुली सापडल्याचा फोन आला आणि उरण पोलिसांनी झाशी गाठली. तेथील पोलिसांच्या मदतीने बेपत्ता मुलींना उरणमध्ये सुखरुपपणे आणण्यात आल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वपोनि राजेंद्र आव्हाड यांनी दिली.पोलीस तपासात तीनही मुली रेल्वेने उत्तर प्रदेशात दाखल झाल्या होत्या. सावत्र आईच्या जाचाला कंटाळून घराबाहेर पडल्या होत्या, त्या घरी न परतण्याच्या निश्चयानेच. त्यामुळे आजतागायत त्यांचा मोबाइलही सुरू केला नव्हता. परगावात पोटापाण्यासाठी रोजगारासाठी शोध सुरू होता. जवळ असलेल्या पैशातून त्यांनी झाशी शहर पोलीस ठाण्यात हद्दीत खोलीही भाड्याने घेतली होती. मात्र भाडेकरुंची पोलिसांना माहिती देण्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशनसाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नातूनच तिन्ही बेपत्ता मुलींचा नई बस्ती झाशी शहर पोलिसांना सुगावा लागला. मुली घरी जाण्यास तयार नसल्याने त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.