शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणातून बेलापूरच्या समुद्रात येणार तीन शिपयार्ड, जहाज बांधणीसह दुरुस्ती उद्योगाला मिळेल चालना

By नारायण जाधव | Updated: May 22, 2025 14:17 IST

बेलापूर येथेच मेरिटाईम बोर्ड मरिना प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. येथूनच मुंबई-नवी मुंबई प्रवासी जलवाहतूक सुरू केली आहे. त्यादृष्टीने सुविधा उपलब्ध आहेत.

नवी मुंबई : बेलापूरच्या समुद्रात खासगीकरणातून लवकरच तीन शिपयार्ड प्रकल्प आकार घेणार आहेत. प्रकल्प विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने विकासकांशी करारनामे केले आहेत. या प्रकल्पांमुळे मुंबई, नवी मुंबईसह आसपासच्या परिसरातील जहाजांची देखभाल-दुरुस्ती, नवीन जहाजांची बांधणी शक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार असल्याने नवी मुंबईच्या विकासात भर पडणार आहे. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात बंदर विभागाने ही माहिती दिली.

केंद्राच्या जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरणाप्रमाणेच महाराष्ट्र शासनानेसुद्धा चार दिवसांपूर्वी आपले जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण जाहीर केले. या धोरणाचा बेलापूर येथे विकसित होणाऱ्या तिन्ही शिपयार्डना लाभ होणार आहे. यातील उद्योगांना १५ टक्के भांडवली अनुदानासह राज्य शासनाकडून कौशल्य विकास सुविधांसाठी ५ कोटींचे अर्थसाहाय्य, कर्मचारी प्रशिक्षणासाठी एक कोटीची मदत दिली जाणार आहे. राज्याच्या जहाज बांधणी धाेरणात महाराष्ट्राने ६,६०० कोटींची गुंतवणूक आणि ४० हजार रोजगाराचे उद्दिष्ट ठेवले आहे.

बेलापूरचे महत्त्व बेलापूर हे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदरापासून जवळ आहे. याच भागात उलवे, तरघर येथेही खासगी जेट्टी आहेत.दोन वर्षांपूर्वी बेलापूरच्या किल्लेगावठाण परिसरात मे. ओमकार इन्फोकॉम प्रा. लिमिटेड कंपनीला नवीन जेट्टी बांधण्यास सीआरझेड प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. ती सध्याच्या अंबुजा सिमेंट जेट्टीसमोर, रेती बंदर आणि बेलापूर किल्ल्याच्या जवळ बांधण्यात येत आहे. तिचा वापर प्रामुख्याने बोटींसाठी लागणारा कच्चा माल, साहित्याची ने-आण करण्यासाठी होणार आहे.

बेलापूर येथेच मेरिटाईम बोर्ड मरिना प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. येथूनच मुंबई-नवी मुंबई प्रवासी जलवाहतूक सुरू केली आहे. त्यादृष्टीने सुविधा उपलब्ध आहेत.

नवी मुंबई विमानतळ, अटल सेतू बेलापूरपासून जवळ आहे. मुंबई-नवी मुंबई प्रवासी जलवाहतुकीअंतर्गत पाम बीच मार्गावरील नेरूळ जेट्टीसुद्धा बेलापूर बंदरपासूनच जवळ आहे. सिडकोचा प्रस्तावित खारघर-नेरूळ कोस्टल राेडही याच भागातून जातो.