अलिबाग : जनावरांची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी पाली पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोंपीकडून १० हजार रु पयांचे दोन बैल आणि टेम्पो ताब्यात घेतला आहे.पाली येथे टेम्पोतून बैलांची वाहतूक करण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. टेम्पोमध्ये दोन बैलांना दाटीवाटीने भरले होते. त्यांना आखूड दोरीने बांधण्यात आले होते. चाऱ्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे त्या जनावरांना त्रास होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे पोलिसांनी तिघांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर प्राण्यांचा छळ अधिनियम, पशू वाहतूक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
बैलांची अवैध वाहतूक करणारे तिघे अटकेत
By admin | Updated: March 27, 2017 06:11 IST