शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

बुलेट ट्रेनच्या बीकेसी स्थानकांसाठी तीन कंपन्यांत स्पर्धा: खर्च दुपटीपेक्षा जास्त वाढणार

By नारायण जाधव | Updated: December 29, 2022 20:25 IST

एमईआयएल-एचसीसीची सर्वात कमी दराची ३६८१ कोटींची निविदा

नवी मुंबई : नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने गेल्या आठवड्यात मुंबई-अहमदाबाद मार्गावरील ठाणे स्थानक आणि डेपोच्या बांधकामासाठी निविदा मागविलेल्या असतानाच मुंबईच्या बीकेसीतील भूमिगत स्थानकासाठी सर्वात कमी एमईआयएल-एचसीसी कंपनीने ३६८१ कोटींची निविदा सादर केली आहे. तरीही कॉर्पोरेशनच्या अंदाजापेक्षा जवळपास दुप्पट दराची ती आहे.

नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने अंदाजे १८०० कोटींचा खर्च गृहीत धरून निविदा जुलै महिन्यात मागविल्या होत्या. मात्र, त्यांना विक्रोळी गोदरेज कंपनीसोबतच्या जमिनीच्या वादामुळे मुदतवाढ दिली होती. अखेर या निविदा आता उघडल्या. यात ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शनसने ४२१७ कोटी, एलॲन्डटीने ४५९० कोटींची निविदा सादर केली आहे. तर मुंबईत जिकडेतिकडे मेट्रोचे जाळे उभारणाऱ्या जे कुमार कंपनीची निविदा अपात्र ठरली आहे.

स्पर्धेत सर्वात कमी दराची निविदा एमईआयएल-एचसीसी कंपनीची असल्याचे कार्पोरेशनच्या कार्पोरेट कम्युनिकेशन विभागाच्या महाव्यवस्थापक सुषमा गौर यांनी सांगितले. आता या तिघांपैकी कोणत्या कंपनीची निविदा नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन मान्य करते, याकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

४.९ हेक्टर जागेवर बीकेसीतील स्थानकबीकेसीतील स्थानक ४.९ हेक्टर जागेवर बांधण्यात येणार आहे. राज्यात उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप-शिंदे सरकार येताच नव्या सरकारने बीकेसीतील जागा त्वरित नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनकडे हस्तांतरीत केली होती. त्यानंतर काॅर्पोरेशनने भूमिगत स्थानकाकरिता ४६७ मीटर लांबीच्या कट आणि कव्हर पद्धतीच्या स्थानकाचे बांधकामासाठी तसेच ६६ मीटरच्या टनेल वेंटिलेशन शाफ्टसाठी आरेखन व निर्मितीसाठी आधी २२ जुलै रोजी निविदा मागविल्या होत्या. त्या उघडण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर ठेवली होती. नंतर गोदरेजसोबतच्या वादामुळे ती वाढविली होती. परंतु, आता अखेर या निविदा उघडल्या आहेत.

महाराष्ट्राची पाच हजार कोटींची हिस्सेदारीसत्तेवर येताच शिंदे सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्र सरकारचे शेअर खरेदीसाठी सहा कोटी रुपये वितरीत केले आहेत. हा बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा मानला गेला. महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच बुलेट ट्रेनचे शेअर अर्थात समभाग खरेदीची तयारी दर्शविली. या प्रकल्पात केंद्र सरकारची दहा हजार कोटी अर्थात ५० टक्के तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची प्रत्येकी २५ टक्के अर्थात पाच हजार कोटींची हिस्सेदारी आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNavi Mumbaiनवी मुंबई