शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी वाहिनी तुंबल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:08 IST

कळंबोलीत शाळेसमोरील प्रकार; सिडकोच्या दुर्लक्षामुळे हाल

कळंबोली : नवीन पनवेल येथील भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित बौद्धिक असक्षम (विशेष) मुलांची सेक्टर १ येथे शाळा आहे. या शाळेसमोरचे ड्रेनेज तुंबले आहे. सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सिडको वसाहतीत ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याने अशी परिस्थिती उद्भवत आहे. लवकरच उपाययोजना करण्याची मागणी पालक करत आहेत. नवीन पनवेल शबरी हॉटेलच्या पाठीमागे सेक्टर १ या ठिकाणी भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित बौद्धिक असक्षम मुलांची शाळा आहे. शाळेसमोरील रस्त्यावर सांडपाणी वाहिनी तुंबल्याने गेल्या आठ दिवसांपासून रस्त्यावर पाणी वाहत आहे, यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून विद्यार्थ्यांना ये-जा करताना अक्षरश: कसरत करावी लागते. अनेकदा मुले पडल्याने त्यांना दुखापतही झाली आहे.मुलांना शाळेत सोडण्यास येणाऱ्या स्कूल व्हॅन, रिक्षा, दुचाकी याच ठिकाणी उभ्या राहत असल्याने विद्यार्थ्यांना सांडपाण्यातूनच ये-जा करावी लागते. शिवाय, चारचाकी वाहन गेल्यानंतर पादचाऱ्यांच्या अंगावर सांडपाणी उडते. याबाबत सिडकोकडे तक्रार करण्यात आली आहे. आठ दिवसांपासून ड्रेनेज तुंबले आहे; परंतु सिडकोकडून दुर्लक्ष होत असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे प्रसिद्धीप्रमुख संतोष आमले यांचे म्हणणे आहे. याबाबत लवकरच उपाययोजना करण्याची मागणी सिडकोकडे आमले यांनी केली आहे.सिडकोने मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित केली नसल्याने ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर नालेसफाईही व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन तळे साचत आहे. ठेकेदाराकडून वरवरचा गाळ साफ करण्यात आला आहे; परंतु माती, प्लास्टिक कचरा जैसे थे आहे. ड्रेनेज साफ करण्यासाठी सिडकोकडे प्रभावी यंत्रणा नसल्याने भाडेतत्त्वावर मशिनद्वारे काही प्रमाणात सफाई केली जाते.