शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारांचा प्रवाशाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 05:34 IST

ओलाचालकाने भाडे नाकारल्याची तक्रार प्रवाशाला ५० हजाराला पडली आहे.

नवी मुंबई : ओलाचालकाने भाडे नाकारल्याची तक्रार प्रवाशाला ५० हजाराला पडली आहे. त्याने गुगलवर ओलाच्या हेल्पलाइनचा नंबर मिळवून त्यावर फोन केला होता. या वेळी तक्रारीसाठी एक रुपये शुल्क भरण्यास सांगून फसव्या लिंकवरून ५० हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी रबाळे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षय कुंभार यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी बदलापूरला घरी जाण्यासाठी ओला अ‍ॅपवरून कार बुक केली होती; परंतु चालकाने कंपनीच्या निश्चित भाड्यापेक्षा जास्त भाड्याची मागणी केली. यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला असता, चालकाने त्यांचे भाडे नाकारले. याची तक्रार करण्यासाठी अक्षय कुंभार यांनी गुगलवरून ओलाच्या हेल्पलाइनचा नंबर मिळवला. या वेळी फोनवरील व्यक्तीने चालकाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी १ रुपये शुल्क भरण्यास सांगितले. त्याकरिता संबंधिताने अक्षय यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. ती लिंक ओपन करून अक्षय यांनी माहिती भरली असता, त्यांच्या बँक खात्यातून पाच वेळा ९,९९९ रुपये कापले गेले. ओलाचालकाच्या तक्रारीच्या प्रयत्नात ५० हजार रुपयांचा त्यांना गंडा बसला आहे. याबाबत त्यांनी बँकेकडे चौकशी केली असता, आॅनलाइन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अक्षय यांनी रबाळे पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार केली आहे.