शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांसाठी हजारोंची फौज

By admin | Updated: August 29, 2014 00:27 IST

ठाणे शहर आणि ग्रामीण तसेच पालघर जिल्ह्यात सुमारे २ लाख ३१ हजार गणपती बाप्पांचे शुक्रवारी आगमन होणार आहे.

ठाणे : ठाणे शहर आणि ग्रामीण तसेच पालघर जिल्ह्यात सुमारे २ लाख ३१ हजार गणपती बाप्पांचे शुक्रवारी आगमन होणार आहे. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साडेतीन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. गणपती स्थापनेपूर्वीच्या घ्यावयाच्या दक्षतेपासून सर्व मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास बंधनकारक केले आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना लक्षात घेऊन विशेष पथक तयार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.ठाणे शहर पोलीस कार्यक्षेत्रात घरगुती १ लाख ४८ हजार ८२१ तर सार्वजनिक एक हजार ४८ बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यासाठी दोन पोलीस उपायुक्त, ३ सहायक पोलीस आयुक्त, २१ पोलीस निरीक्षक, २९ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, ८७९ पोलीस कर्मचारी (स्त्री-पुरुष) तसेच पाच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह ३३ पोलीस जीप, ५ दंगाविरोधी वाहने (वज्र), ३६ वायरलेस संच, ९६ वॉकीटॉकी, २ गॅस गन, २ दुर्बीण आणि ६० बॅरिकेड्स देण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यात ९३७ सार्वजनिक आणि २९ हजार ५५९ घरगुती बाप्पांचे आगमन होणार असून ९९ ठिकाणी एक गाव एक गणपतीचा समावेश आहे. यासाठी एक पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, ५ उपअधीक्षक, ५१ पोलीस अधिकारी, ७३६ पोलीस कर्मचारी (पुरुष-महिला), २०५ होमगार्ड (पुरुष-महिला) आणि दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात २४२६ सार्वजनिक आणि ४८ हजार १३५ घरगुती बाप्पांचे आगमन होणार असून १७३ ठिकाणी एक गाव एक गणपतीचा समावेश आहे. यासाठी एक पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, ६ उपअधीक्षक, ८२ पोलीस अधिकारी, ८७५ पोलीस कर्मचारी, २९५ होमगार्ड आणि एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी असा बंदोबस्त राहणार आहे.बाप्पा स्थापनेपूर्वी घ्यावयाच्या दक्षतेबाबत १२ सूचना केल्या आहेत. यात जवळील पोलीस ठाण्यामध्ये मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांच्या माहितीपासून वापरण्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी, ज्या ठिकाणी मूर्ती बसवणार आहेत तेथे सीसीटीव्ही, विद्युतपुरवठा खंडित झाल्यास त्याची योग्य व्यवस्था तसेच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार असतील तर त्यांची माहिती देणे बंधनकारक आहे.